शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

ओवेसी बंधूंच्या विखारी प्रचारामुळे मुस्लिमांचे नुकसान

By admin | Updated: February 16, 2017 22:02 IST

राकाँचे खासदार माजीद मेमन यांचे पत्रकार परिषदेत टीकास्त्र

अकोला, दि. १६- मुस्लीम समाजाला भेडसावणार्‍या प्रश्नांची उकल न करता जाहीर सभांमधून केवळ विखारी प्रचार करण्याचे काम एमआयएमच्या दोन्ही उच्चशिक्षित ओवेसी बंधूंनी सुरू केले आहे.ओवेसी बंधूंच्या कार्यशैलीमुळे मुस्लीम समाजाचे नुकसान होत असल्याचे टीकास्त्र राकाँचे खासदार अँड. माजीद मेमन यांनी सोडले. गुरुवारी मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना व भाजपमध्ये वाक्युद्ध रंगले असून, कालपर्यंत गळ्य़ात गळे घालून सत्तेची फळे चाखणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्धव ठाकरे एकमेकांचे जाहीर सभांमधून वाभाडे काढत असल्याची टीका खा.अँड. माजीद मेमन यांनी केली. राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजप-शिवसेनेला सर्वसामान्य जनतेचा विसर पडला असून, कोण खरा व कोण खोटा, हे सिद्ध करण्याची जणू स्पर्धाच रंगली असल्याचे अँड. मेमन यावेळी म्हणाले. सत्ताधार्‍यांच्या भूमिकेमुळे सर्वसामान्य जनता संभ्रमात असून, ह्यअच्छे दिनह्णच्या वल्गना कधीच्याच हवेत विरल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विकासाच्या मुद्यांवरच निवडणूक लढवत असल्याचे अँड. मेमन यांनी स्पष्ट केले. ह्यट्रिपलह्ण तलाकच्या मुद्यावर केंद्र सरकारने मुस्लीम समाजातील महिलांच्या भावना समजून घ्याव्यात. महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत, ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. मात्र त्यापूर्वी महिलांची मते विचारात घेऊन केंद्र सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, असेही अँड. मेमन यांनी सांगितले. महापालिकेच्या निवडणुकीत अकोल्यात राष्ट्रवादीला यशापासून कोणी रोखू शकणार नाही. सुज्ञ जनतेने राष्ट्रवादीला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे खा.अँड. माजीद मेमन यांनी सांगितले. सरकार कोसळण्याच्या स्थितीतराज्यातील युती सरकार अस्थिर झाले असून, ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. शिवसेनेने पाठिंबा काढला किंवा नाही, आम्ही मात्र भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे खा. माजीद मेमन यांनी स्पष्ट केले. डोक्यात टोपी, शेरवानी घालून मुस्लीम नेत्यांचा आवहैदराबादमध्ये स्थापन केलेल्या एमआयएम पक्षाचे ओवेसी बंधू उच्चशिक्षित आहेत. विकासापासून वंचित असलेल्या मुस्लीम समाजाच्या समस्या केंद्र शासनाकडे कायदेशीररीत्या पाठपुरावा करून सोडवणे अपेक्षित असताना दोन्ही बंधू मुस्लिमांची माथी भडकावण्याचे काम करीत आहेत. डोक्यात टोपी व शेरवानी घालून मुस्लिमांचा नेता असण्याचा ते आव आणत असल्याची टीका खासदार माजीद मेमन यांनी केली.