Lokmat Online Impact : नगर प्रशासन झाले जागे; मुर्तीजापूरचे हुतात्मा स्मारक झाले चकाचक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2022 07:10 PM2022-08-14T19:10:02+5:302022-08-14T19:11:07+5:30

Lokmat Online Impact : नगर परिषदेच्यावतीन या हुतात्मा स्तंभाची स्वच्छता करण्यात आली व रात्री रंगरंगोटीही करण्यात येणार आहे. 

Lokmat Online Impact : City administration wakes up; Murtijapur's Martyr's Memorial became glittering | Lokmat Online Impact : नगर प्रशासन झाले जागे; मुर्तीजापूरचे हुतात्मा स्मारक झाले चकाचक 

Lokmat Online Impact : नगर प्रशासन झाले जागे; मुर्तीजापूरचे हुतात्मा स्मारक झाले चकाचक 

Next

 - संजय उमक

मूर्तिजापूर :   हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला मुर्तीजापूर शहरातील हुतात्मा स्तंभ आता काहीसा अडगळीत पडल्याने दुर्लक्षित झाल्याचे वृत्त लोकमत ऑनलाइनवर रविवारी झळकताच नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले. सायंकाळीच नगर परिषदेच्यावतीन या हुतात्मा स्तंभाची स्वच्छता करण्यात आली व रात्री रंगरंगोटीही करण्यात येणार आहे. 

'जे देशासाठी लढले ते अमर हुतात्म्ये झाले' असे म्हटले जात असले तरी त्याच्या बलिदानाच्या स्मरणार्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तत्कालीन हुतात्मा स्तंभ उभा आहे. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर भारताची २५ वर्षे पूर्णत्वास झाल्या निमित्ताने तालुक्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ येथील (छत्रपती शिवाजी महाराज चौक) जयस्तंभ चौकात १५ अॉगष्ट १९ ७२ ते १४ अॉगष्ट १९७३ दरम्यान भारत सरकारने हुतात्मा स्तंभ उभारला आहे, या स्तंभावर समोरच्या बाजूला भारताचे संविधान (प्रस्ताविका) कोरली आहे तर दुसऱ्या बाजूला २० हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत. ९ अॉगष्ट हा अॉगष्ट क्रांती दिन म्हणून देशभर सर्वत्र साजरा केल्या जातो त्यातही स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने आठवडाभर देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, परंतु मूर्तिजापूरात हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्तंभाकडे प्रशासनाचे सोईस्कर अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, असल्याचे वृत्त 'लोकमत' ने १४ अॉगष्ट रोजी प्रकाशित करताच स्थानिक प्रशासनाला खळबळून जाग आला, संध्याळी पालिका कर्मचारी तेथे दाखल होऊन पाण्याने स्वच्छ परीसरही स्वच्छ करुन रात्री या हुतात्मा स्तंभची रंगरंगोटी करण्याचेही काम सुरु करणार असल्याचे नगर परिषद प्रशासना कडून सांगण्यात आले. यासाठी नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक विजय लकडे यांनी कर्मचारांना घेऊन संध्याकाळी या ठिकाणी ध्वनिक्षेपकपही लावण्यात आले.   हा हुतात्मा स्तंभ अडगळीत पडल्याची बाब स्थानिक प्रशासनाच्या व जनतेच्या लक्षात आणून दिली. याबाबत स्थानिक नागरीकांनी लोकमतचे आभार मानले.

Web Title: Lokmat Online Impact : City administration wakes up; Murtijapur's Martyr's Memorial became glittering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.