शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतचा दणका; खाबूगिरी करणाऱ्या वाहतूक पोलिसांचा शोध घेण्याचे निर्देश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 12:46 IST

खामगाव: वाहतूक पोलिसांच्या खाबुगिरीची लक्तरे ‘लोकमत’ने  बुधवारी स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून वेशीवर आणली. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देहप्ता वसुलीसाठी आलेल्या वाहतूक पोलिसांना हुडकून काढण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिलेत. बुधवारी पहाटेपासूनच ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या स्टिंग आॅपरेशनची धूम सोशल मिडीयावर दिसून आली. बुधवारी वाहतूक पोलिसांसह पोलिस प्रशासनामध्ये खळबळ उडाल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: वाहतूक पोलिसांच्या खाबुगिरीची लक्तरे ‘लोकमत’ने  बुधवारी स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून वेशीवर आणली. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, खाबुगिरी करणारे ते दोन वाहतूक पोलिस हुडकून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांकडून हप्ता वसुली करण्यात येत असल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणली. अतिशय धक्कादायक असलेल्या या गंभीर बाबीची दखल जिल्हा पोलिस अधिक्षकांसह, निवासी पोलिस अधीक्षकांनी घेतली असून, हप्ता वसुलीसाठी आलेल्या वाहतूक पोलिसांना हुडकून काढण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिलेत. दरम्यान, बुधवारी पहाटेपासूनच ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या स्टिंग आॅपरेशनची धूम सोशल मिडीयावर दिसून आली. पोलिस ग्रुपसोबतच इतर सामाजिक आणि माध्यमांच्या ग्रुपवर ‘लोकमत’च्या बातमीची चर्चा दिसून आली. या पार्श्वभूमीवर बुधवारी वाहतूक पोलिसांसह पोलिस प्रशासनामध्ये खळबळ उडाल्याचे दिसून आले.

वाहतूक पोलिसांचा माध्यमांवर दबाव!

वाहतूक पोलिसांच्या खाबुगिरीचा भंडाफोड मंगळवारी दुपारी ‘आॅनलाईन’ लोकमतवर झाला. याची माहिती समजताच ग्रामीण पोलिस स्टेशनशी संबधीत असलेल्या दोन वाहतूक पोलिसांनी माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकरण हाताबाहेर गेल्याचे निदर्शनास येताच, सुरूवातीला विनवणी केल्यानंतर ‘पाहून घेवू’ असा दमही या वाहतूक पोलिसांनी भरला.

वरिष्ठ अधिकाºयांकडून हालचाली!

दुचाकी स्वारकावर कारवाई न करण्यासाठी पैशांची मागणी करणाºया दोन वाहतूक पोलिसांना जिल्हा पोलिस अधिक्षकांनी शनिवारीच निलंबित केले आहे. त्याअुनषंगाने खाबुगिरी करणाºया दोन पोलिसांवर कारवाईचा पाश आवळल्याजाणार असल्याचे संकेत आहेत. त्यादृष्टीकोनातून पोलिस प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावtraffic policeवाहतूक पोलीस