शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Lokckdown Efect :  ३ हजार चहा विक्रेत्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 10:31 IST

चहाची दुकानेच बंद असल्याने तब्बल ५० लाखांची रोजची उलाढाल असलेला हा व्यवसाय ठप्प पडला आहे.

- सचिन राऊत  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना या तीव्र संसर्गजन्य विषाणूमुळे संचारबंदी तसेच लॉकडाउन असल्याने जिल्ह्यातील तब्बल ३ हजारांपेक्षा अधिक चहाची दुकाने बंद असल्याने त्यांच्यासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे मोठे संकट आहे. एक चहा विक्रेता दिवसाला १ हजार ते २ हजार रुपयांचा चहा विक्री करून त्याचा उदरनिर्वाह करतो; मात्र आता चहाची दुकानेच बंद असल्याने तब्बल ५० लाखांची रोजची उलाढाल असलेला हा व्यवसाय ठप्प पडला आहे. त्यामुळे चहा विक्रेत्यांना चांगलाच फटका बसला असून, ते आता मोलमजुरी तसेच एमआयडीसीत सुरू झालेल्या उद्योगांकडे रोजगारासाठी पर्याय शोधत आहेत.अकोला शहरासह जिल्ह्यात चहा पिणाऱ्यांची मोठी संख्या आहे. प्रत्येक शासकीय कार्यालय, हॉस्पिटल तसेच चौकाचौकात चहाची दुकाने असून, त्यांच्याकडे चहा पिणाऱ्यांची मोठी गर्दी असते; मात्र २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू आणि त्यानंतर लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे चहाची दुकाने बंद करण्यात आली आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद असल्याने चहा विक्रेत्यांनाही त्याचा जबर फटका बसला आहे. जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी केलेल्या सुमारे ३ हजारांपेक्षा अधिक चहा विक्रेत्यांची दुकाने, हातगाड्या तसेच छोट्या कॅन्टीन बंद असल्याने त्यांची लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. परिणामी चहा विक्री करून संसार चालविणाºया या चहा विक्रेत्यांसमोर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्याची मोठी जबाबदारी पेलण्याचे संकट उभे ठाकले आहे. चहाची दुकाने गत एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून बंद असल्याने त्यांनी आता अन्य रोजगार सुरू केला आहे.

किस्त, उधारी चुकविण्यास अडचणीचहा विक्रेते रोज बँकेत १०० रुपये तसेच २०० रुपये या प्रमाणे एजंटकडे पैसे गोळा करीत असल्याचे चहा विक्रेत्याने सांगितले; मात्र गत एक महिन्यापासून चहा विक्रीची दुकानेच बंद असल्याने भविष्यातील छोट्या मोठ्या संकटकाळासाठी जमा केलेली ही रक्कम आता बंद करण्यात आली आहे. पर्यायाने हीच रक्कम बँकेतून परत घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यात येत असल्याचेही चहा विक्रेत्यांचे म्हणणे आहे. अशातच बँकेकडून घेतलेले मुद्रा कर्ज तसेच इतर कर्ज आणि उसनवारीचे पैसे चुकविण्यासही मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.ू

चहा विक्री करून उदरनिर्वाह तसेच आवश्यक त्या सुविधा कुटुंबीयांना पुरविण्याचा प्रयत्न चहा विक्रीच्या व्यवसायातून करण्यात येतो; मात्र एक महिन्यापासून चहा विक्रीची दुकाने बंद असल्याने चहा विक्रेत्यांसमोर संकटच निर्माण झाले आहे. शासनाने चहा विक्रेत्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी किंवा चहाची दुकाने नियम व अटी घालून सुरू करण्याची परवानगी द्यावी.-अनुप वर्मा, चहा विक्रेते,आळशी प्लॉट, अकोला

कोरोनाचे संकट टाळण्यासाठी लॉकडाउन महत्त्वाचे आहे. चहाची दुकाने बंद असली तरी त्याचा फटका आमच्यासारख्या काही चहा विक्रेत्यांना बसला आहे. या काळात संसाराची गाडी हाकण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे; मात्र ही वेळही निघून जाईल आणि पूर्वीसारखे व्यवसाय आणि उद्योग सुरू होतील; मात्र त्यासाठी आपण प्रत्येकाने घरात राहून प्रशासनास सहकार्य करण्याची सध्या गरज आहे. संकटाचे दिवस निघून जातील.-पंकज पाटील, चहा विक्रेते,गांधी रोड, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या