शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019:विदर्भात ‘स्वाभिमानी’ची ‘शिट्टी’ वाजणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 13:18 IST

वर्धेत काँग्रेसने चारूलता टोकस यांच्या एकमेव नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे, तर राष्टÑवादीने बुलडाण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे विदर्भात ‘स्वाभिमानी’ची ‘शिट्टी’ वाजणार नाही, हे स्पष्टच होत आहे.

राजेश शेगोकार,अकोला: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातून विस्तारत विदर्भाकडे लक्ष केंद्रित केले होते. स्वाभिमानीचे राष्टÑीय अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी वर्धेतून विदर्भ मोहिमेची सुरुवात करून काँग्रेस आघाडीत सहभागी होण्याकरिता वर्धा व बुलडाणा या लोकसभा मतदारसंघांवर दावा केला होता; मात्र त्यांच्या वाट्याला विदर्भातील एकही जागा येण्याची शक्यता नाही. वर्धेत काँग्रेसने चारूलता टोकस यांच्या एकमेव नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे, तर राष्टÑवादीने बुलडाण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे विदर्भात ‘स्वाभिमानी’ची ‘शिट्टी’ वाजणार नाही, हे स्पष्टच होत आहे.स्वाभिमानीने काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्यासाठी सहा जागांचा प्रस्तावही औपचारिक स्वरूपात दिला होता. त्यामध्ये हातकणंगले, माढा व विदर्भातील वर्धा व बुलडाणा या चार मतदारसंघांवर त्यांची सर्वाधिक मदार होती. या चार जागांपैकी हातकणंगलेची जागा राष्टÑवादीने शेट्टींसाठी सोडली आहे, तर माढासाठी राष्ट्रवादीतच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे सुबोध मोहितेंसाठी वर्धा व रविकांत तुपकरांसाठी बुलडाणा या दोन जागा निश्चितच मिळाव्यात, हा स्वाभिमानीचा आग्रह होता. या दोन मतदारसंघांसाठी माध्यमातून स्वाभिमानीला विदर्भात राजकीयदृष्ट्या आपली ताकद वाढवायची आहे; मात्र वर्ध्याच्या जागेवर काँग्रेसच्या चारूलता टोकस यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. गुरुवारी बुलडाण्यात राष्टÑवादीने डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव जाहीर केल्यामुळे स्वाभिमानीचा विदर्भातील दावा जवळपास संपुष्टात आला आहे. तुपकर हे स्वाभिमानीचा विदर्भातील चेहरा असून, सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी सोडल्यानंतर संघटनेत शेट्टींनंतरचे स्थान त्यांना मिळाले होते. त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाचीही जबाबदारी टाकण्यात आली होती, तर सुबोध मोहितेंच्या रूपाने स्वाभिमानीला आणखी एक चेहरा पूर्व विदर्भात मिळाला होता; मात्र या दोघांनाही अपेक्षित असलेला मतदारसंघ मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्याने आता त्यांच्या भूमिका काय राहतील, यावरही स्वाभिमानीचे विदर्भातील भविष्य ठरणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाPoliticsराजकारणRavikant Tupkarरविकांत तुपकर