शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

Lok Sabha Election 2019 : सट्टा बाजार तेजीत; कमळाचे दर सर्वात कमी, तर पंजा-कपबशी मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 15:45 IST

माहितीनुसार भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या कमळाच्या फुलाचे दर सर्वात कमी आहेत, तर पंजा आणि कपबशी त्यापाठोपाठ आहे.

- संजय खांडेकरअकोला: अकोला लोकसभा मतदारसंघातील प्रमुख तीन लढतींवर अकोल्यातील सट्टा बाजार तेजीत आहे. सट्टा बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या कमळाच्या फुलाचे दर सर्वात कमी आहेत, तर पंजा आणि कपबशी त्यापाठोपाठ आहे; मात्र नेहमीप्रमाणे यंदा सट्टा लावणाऱ्यांचे प्रमाणच घसरल्याची माहिती समोर आली आहे.अकोल्यातील फुलाचे दर ८ ते १२ पैसे असून, त्यानंतर काँग्रेस उमेदवार हिदायत पटेलच्या पंजाचे दर ७ ते ८ रुपये आणि वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या कपबशीचे दर ९ ते १० रुपयांवर खायवाडी सुरू आहे. अकोला सट्टा बाजारात फुलावर एकतर्फी ‘खायवाडी’ सुरू असल्याने ते दर २५ पैशापासून कमालीचे खाली घसरत ८ पैशावर आले आहे. निवडणुकीच्या आधीपासूनच सट्टा बाजारातील एकंदरीत चित्र भाजपकडे झुकलेले दिसत आहे, तर इतर दोन्ही उमेदवार थोड्याफार अंतराने विभागून मागे-पुढे राहणार असल्याचे चित्र सट्टा बाजारात आहे. बाजारात कोट्यवधींचा सट्टा लावणारे लोक हे संपूर्ण मतदारसंघाचा संभाव्य आढावा घेत बाजी लावत असतात. त्यामुळे त्यांचे अंदाज जवळ जवळ खरे ठरतात असे मानले जाते. मतमोजणी २३ मे रोजी असल्याने आता एक महिनाभर सट्टा बाजारातील उलाढाल सुरू राहणार आहे. सट्टा बाजारातील तज्ज्ञांनी वर्तविलेला अंदाज कितपत खरा ठरतो, हे निवडणूक निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. ‘आयपीएल’च्या सामन्यावर सटोडियांचा भरसट्टा राजकीय असो की क्रिकेटचा, खायवाडी करणारे सटोडिये आणि सटटा लावणारे लोक तेच असतात. आयपीएलचे क्रिकेट सामने आणि अकोला लोकसभा निवडणूक एकाच वेळी आल्याने दोन्ही सट्टा बाजार रंगलेला आहे; मात्र सटोडिये आयपीएलच्या सामन्यात जास्त गुंतलेले दिसत आहेत. राजकीय निवडणुकीपेक्षा जास्त लागवाडी आणि खायवाडी क्रिकेट सामन्यावर होत असल्याने सटोडिये लोकसभेपेक्षा क्रिकेटच्या सट्ट्याकडे वळले आहेत. विजयाच्या ‘लीड’वर पैजविजयी होणाºया उमेदवारास कितीचा लीड मिळेल, यावरही वेगळी पैज सट्टा बाजारात लागली आहे. ५० हजार, एक लाख आणि दोन लाख अशा तीन प्रकारच्या लीडवर खायवाडी झाली आहे. सट्टा बाजाराप्रमाणे अनेक ठिकाणी आपसात अशा पैज लागल्याचेही समजते. यामध्ये मोठी उलाढाल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर