शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lok Sabha Election 2019 : युतीच्या प्रचारात पालकमंत्री अन् शिवसंग्राम नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 13:39 IST

भाजपाचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा समावेश तर नाही; मात्र प्रचार फलकावर त्यांच्या फोटोलाही स्थान न दिल्याने या दोन गटातील संघर्ष टोकाचा झाल्याचे चित्र आहे.

अकोला: भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या अकोला लोकसभा मतदारसंघात नामदार-खासदार असे दोन गट पडले असून, या गटांमधील अंतर कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. भाजपाचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा समावेश तर नाही; मात्र प्रचार फलकावर त्यांच्या फोटोलाही स्थान न दिल्याने या दोन गटातील संघर्ष टोकाचा झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे युतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचाही प्रचारात कुठेही उल्लेख होताना दिसत नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ सबका विकास’ हा मंत्र देऊन गेल्यावेळी लोकसभा निवडणूक जिंकली; मात्र मोदींनी दिलेल्या या शिकवणीला भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांनीच वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. अकोल्यात खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वातील गट अतिशय प्रबळ असा आहे. आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल यांच्यासह दोन नगरसेवक वगळता भाजपाचे सर्व नगरसेवक हे खा. धोत्रे यांचे कट्टर समर्थक आहेत. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे हे खासदार व नामदार अशा दोन्ही गटात दिसतात त्यामुळे धोत्रे यांनी पूर्ण मतदारसंघातील भाजपावर पकड केली आहे. पक्षातील राजकीय वादातून निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे खासदार-नामदार असे दोन गट पडले व या गटांमधील अंतर वाढत गेल्याने खासदार-नामदारांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना विरोधी गटातील नेते व पदाधिकारी उपस्थित राहत नाहीत. अकोल्यासाठी हे चित्र आता सवयीचे झाले आहे; मात्र लोकसभा निवडणूक ही पक्षासाठी अतिशय प्रतिष्ठेची अन् सन्मानाची असल्यामुळे भाजपातील सर्व गट-तट ‘फिर एक बार मोदी सरकार’ या घोषणेकरिता एकत्र येतील, अशी अपेक्षा वर्तविली जात होती, ती सुद्धा सपशेल फोल ठरली असून, पालकमंत्र्यांना प्रचारासह फलकांवरही स्थान देण्यात आलेले नाही. पालकमंत्र्यांना चंद्रपूर, वर्धेसह स्टार प्रचारकाची जबाबदारीअकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे चंद्रपूर व वर्धा अशा दोन मतदारसंघासह स्टार प्रचारकाची जबाबदारी पक्षाने सोपविली आहे. त्यामुळे पहिल्या टप्यात मतदान पार पडत असलेल्या या दोन मतदारसंघात पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या दौऱ्यांचे नियोजन तसेच उमेदवाराच्या प्रचारासाठी ते दोन्ही मतदारसंघात सक्रिय आहेत.

 मेटेंचे समर्थक प्रचारापासून दूरभाजपा, शिवसेना महायुतीचा घटक पक्ष असलेल्या विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्तेही युतीच्या प्रचारापासून दूरच दिसत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या तिकिटावरून झालेल्या राजकारणामुळे अकोल्यात शिवसंग्राम आणि खासदार गटामध्ये निर्माण झालेली दरी पुढच्या पाच वर्षात रुंदावली आहे. या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी विनायक मेटे यांनी नागपुरात मेळावा घेऊन युती धर्म पाळला आहे; मात्र अकोल्यात शिवसंग्रामला सोबत घेण्यात भाजपानेही पुढाकार घेतला नसल्याची माहिती शिवसंग्रामच्या सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक