शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
2
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
3
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
4
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
5
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
6
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
7
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
8
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
9
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
10
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
11
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
12
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
13
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
14
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
15
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
16
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
17
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
18
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
19
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
20
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?

Lok Sabha Election 2019 : युतीच्या प्रचार रथावर बाळासाहेबांचे विस्मरण; अटलजींचे मात्र स्मरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:56 PM

अकोला: भाजपा-शिवसेनेने युतीची घोषणा करून संयुक्तपणे प्रचाराचा राज्यभरात शुभारंभ केला आहे. या प्रचारामध्ये भाजपाने सरकारच्या योजनांचे गुणगान गाणारा डिजिटल प्रचार रथ तयार केला आहे.

- राजेश शेगोकारअकोला: भाजपा-शिवसेनेने युतीची घोषणा करून संयुक्तपणे प्रचाराचा राज्यभरात शुभारंभ केला आहे. या प्रचारामध्ये भाजपाने सरकारच्या योजनांचे गुणगान गाणारा डिजिटल प्रचार रथ तयार केला आहे. या रथावरील पोस्टरवर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या फोटोला स्थान दिले असले तरी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचे मात्र विस्मरण झाले आहे. विशेष म्हणजे, पक्षाचे एकेकाळचे हेवीवेट नेते लालकृष्ण अडवाणी तसेच राज्यातील प्रमुख नेते नितीन गडकरी यांचेही छायाचित्र रथावर लावण्यात आलेले नाही.अकोल्यातील गल्लीबोळांत सध्या भाजपचा प्रचार रथ फिरत आहे. २७ मार्च रोजी या प्रचाररथाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मित्रपक्ष शिवसेनेसह महायुतीमधील घटक पक्षांना ‘खो’ देण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. त्यावेळी महायुतीमधील शिवसेनेचे पदाधिकारी, विविध पक्षांतील कार्यकर्त्यांच्या अनुपस्थितीमुळे सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र दिसून आले होते. या पृष्ठभूमीवर आता प्रचार रथावर शिवसेनेसाठी आराध्य असलेल्या बाळासाहेबांचाच फोटो रथावर नसल्याने ही बाब सामान्य शिवसैनिकांना चांगलीच खटकली आहे. या प्रचार रथावरून भाजप-शिवसेनेत रुसव्या-फुगव्याचे राजकारण रंगण्याची चिन्हेआहेत. या प्रचार रथावर एका बाजूला भाजपाध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रामदास आठवले आणि रावसाहेब दानवे यांचे फोटो असून, एका बाजूला फक्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा एकट्याचाच फोटो आहे. फोटोंमधून नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील घटक पक्षाचे नेते महादेव जानकर, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांनाही स्थान मिळालेले नाही.सदर प्रचार रथ हे मुंबईतूनच तयार होऊन आले आहेत. भाजपा-शिवसेनेच्या समन्वय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार हे रथ तयार झाले आहेत. याव्यतिरिक्त काही सूचना नाहीत.-रमेश कोठारी, भाजपा प्रचार समिती प्रमुख अकोला लोकसभा मतदारसंघ. बाळासाहेब हे आमचे आराध्य आहेत. शिवसैनिकांसह भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठीही त्यांचे विचार प्रेरक आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो आवश्यकच आहे. यासंदर्भात समन्वय समितीकडे विचारणा केली जाईल.नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख, शिवसेना अकोला. 

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना