शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

लॉकडाउन : पुण्यात अडकलेल्या युवकाने पुणे ते हिवरखेड सायकलने केला प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 09:54 IST

पुण्यात अडकलेल्या युवकाने कुठलेही वाहन न मिळाल्याने पुणे ते हिवरखेड असा प्रवास सायकलने करीत हिवरखेड गाठले.

हिवरखेड : लॉकडाउन मुळे पुण्यात अडकलेल्या हिवरखेड येथील युवकाने कुठलेही वाहन न मिळाल्याने स्वगृही परतीसाठी पुणे ते हिवरखेड असा प्रवास सायकलने करीत हिवरखेड गाठले. या युवकासह इतरही बाहेरगावहून आलेल्या युवकाचे आगमन झाल्यानंतर त्याची ग्रामपंचायत व कोरोनामुक्त हिवरखेड समितीने आरोग्य तपासणी करण्यात आली.हिवरखेड येथील बरेच युवक-युवती शिक्षण व नोकरी निमित्ताने पुण्यात स्थित आहे; कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून लोकांनी घरातच राहावे, असा आदेश आहे. त्यामुळे पुणेसह देशातील नागरिकांना बाहेर निघत येणे कठीण झाले होते. अशा स्थितीत त्यांना अन्नापासूनसुद्धा वंचित राहण्यात पाळी येत होती; परंतु शासनाने घरी जाण्यास इच्छुक लोकांना परवानगी देण्यासाठी ई-पासेस तयार केल्या आहेत. ई-पासेस मिळविण्यासाठी त्यांना आरोग्य तपासणी अनिवार्य आहे. सर्व अटीची पूर्तता केल्यानंतर प्रवासासाठी ई-पास मिळाल्यानंतर एवढ्या दूरवरून प्रवासासाठी सुविधा नसल्याने अडचणी जात आहे. यावर मात करीत हिवरखेड येथील गिºहे नगरमधील सत्यविजय रमेश जऊळकार हा युवक पुणे येथून हिवरखेडला चक्क सायकलने दाखल झाला. कोविड १९ च्या ग्रामपंचायत व कोरोनामुक्त हिवरखेड समितीकडून त्याची व इतर बाहेरगाव येथून आलेल्यांची डॉ. ठाकरे यांनी आरोग्य तपासणी करून त्यांच्या हातावर स्टॅम्प लावून त्यांना घरातच क्वारंटीन राहण्यास सांगितले. तपासणी केल्यानंतर या युवकाचे ग्रामपचांयतचे ग्रामसेवक भीमराव गरकल, माजी सरपंच सुरेश ओंकारे डॉ. रामदादा तिडके, संवादचे सतीश इंगळे व २प्रेस क्लबचे श्यामशील भोपळे व बाळासाहेब नेरकर यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाPuneपुणे