शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’ तीन दिवसांचे...खरेदी महिनाभराची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 10:20 IST

एवढ्या मोठ्या गर्दीतून घरी किराणा नेला की कोरोना, ही शंकाच उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्याच्या बाजारपेठेतील कोणत्याही गल्लीत केवळ गर्दीचेच चित्र होते. भाजी बाजार, किराणा बाजारासह इतर साहित्य खरेदीसाठी अकोलेकरांनी केलेली झुंबड पाहता अ‍ॅनलॉकनंतरचा सर्वाधिक गर्दीचा शुक्रवार हा दिवस ठरला. शुक्रवार संध्याकाळपासूनच तीन दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाल्याने पुढील तीन दिवस काहीही मिळणार नाही, त्यामुळे अकोलेकरांनी केलेली खरेदी जणू पुढील तीन महिन्यात काही मिळणार नाही, अशीच होती. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गर्दी कमी होण्याच्या उद्देशाने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा उद्देशच शुक्रवारच्या गर्दीने मोडीत काढला असून, एवढ्या मोठ्या गर्दीतून घरी किराणा नेला की कोरोना, ही शंकाच उपस्थित होते.जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ हजाराच्यावर झाली असून, मृत्यूची संख्या शंभर झाली आहे. दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांनी १८ ते २० जुलैदरम्यानच्या तीन दिवसात लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच सेवा, आस्थापना, बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवसात काहीही मिळणार नाही, हे लक्षात आल्यावर अकोलेकरांनी संध्याकाळी बाजारात मोठी गर्दी केली. अकोल्यासोबतच आता ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरले आहेत. या पृष्ठभूमिवर जिल्ह्यात तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे; मात्र लॉकडाऊनचे काही खरे नाही, आधी २१ दिवस लॉकडाऊन म्हणत तीन महिने सगळे बंद ठेवले होते. आता पुन्हा असे होणार नाही, याची शाश्वती नाही. त्यापेक्षा आजच खरेदी करून ठेवलेले बरे, या विचारातून अकोलेकरांनी भाजी बाजार, किराणा दुकान, पिठाची गिरणी, मोबाइलच्या दुकानावर चांगलीच गर्दी केली.

पेट्रोल पंप अन् दारूच्या दुकानांवरही गर्दीलॉकडाऊनच्या तिन दिवसात शहरातील पेट्रोल पंपही बंद ठेवण्यात येणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी ५ पेट्रोलपंप सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिन दिवस कोणालाही बाहेर निघता येणार नाही. तरीही पेट्रोलपंपावर गर्दी होती. दुसरीकडे दारुच्या दुकानांवरही मद्य प्रेमींनी गर्दी केली होती.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक