शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाउन’: अकोला एसटी विभागाला २२ कोटींचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 14:22 IST

४३ दिवसांत अकोला एसटी विभागाने २२ कोटी ६१ लाख ५१ हजार ३१९ रुपयांचे उत्पन्न गमाविले आहे. 

- संजय खांडेकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना महामारीला टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने २१ मार्चपासून लालपरीचा चक्काजाम केला. त्यामुळे २१ मार्चपासून राज्यभरातील बसगाड्या आहे तिथेच थांबविण्यात आल्या आहेत. या ४३ दिवसांत अकोलाएसटी विभागाने २२ कोटी ६१ लाख ५१ हजार ३१९ रुपयांचे उत्पन्न गमाविले आहे.   महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अकोला विभागांतर्गत अकोला १, अकोला २, अकोट, कारंजा, मंगरूळपीर, वाशिम, रिसोड, तेल्हारा, मूर्तिजापूर डेपोचा कारभार चालतो. विभागातून दररोज २२२० फेºया चालतात. कोरोना संक्रमणामुळे  दररोजच्या फेºया थांबल्याने १४,६०५२ किमीचा दररोजचा प्रवास रद्द झाला आहे. त्यामुळे दररोज होणारे ५२ लाख ५९ हजार ३३३ रुपयांचे उत्पन्नही थांबले आहे. २१ मार्च ते ३ मेपर्यंतच्या ४३ दिवसांचा हिशेब केल्यास अकोला एसटी विभागाने २२ कोटी ६१ लाख ५१ हजार ३१९ रुपयांचे उत्पन्न गमाविले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने एसटी विभागाच्या बसगाड्या यापुढे कशा धावतील, याबाबत संभ्रम आहे.

मार्गदर्शक तत्त्वाच्या निर्देशांची प्रतीक्षा...शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पुढच्या निर्देशांची वाट पाहणे सुरू आहे. आरोग्याच्या दृष्टीने अनेक मार्गदर्शक तत्त्वे पुढे सांभाळण्याची गरज आहे. सॅनेटायझरिंग सोबतच, सामाजिक अंतर आणि चालक-वाहकांसोबतच प्रवाशांची घ्यावयाची काळजी काय असेल, याची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच येणार असल्याचे संकेत आहेत.

लॉकडाउनच्या काळात डीझल गाड्यांचा आणि त्यातील बॅटरींचा सांभाळ करण्यासाठी प्रत्येक डेपोत दररोज गाड्या सुरू करून बंद कराव्या लागत आहेत. आम्ही अत्यावश्यक सेवेत असलो तरी शासनाच्या मार्गदर्शक निर्देशाची वाट पाहणे सुरू आहे.- चेतना खिरवाळकर, विभागीय नियंत्रक, एसटी विभाग अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटी