शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘स्थायी’च्या सभापती पदासाठी भाजपमध्ये ‘लॉबिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 12:47 IST

अकोला: महापालिकेतील स्थायी समितीच्या सदस्यपदी दहा सदस्यांची निवड झाली. आता सभापती पदावर विराजमान होण्यासाठी भाजपमध्ये ‘लॉबिंग’ केल्या जात असल्याची माहिती आहे.

अकोला: महापालिकेतील स्थायी समितीच्या सदस्यपदी दहा सदस्यांची निवड झाली. आता सभापती पदावर विराजमान होण्यासाठी भाजपमध्ये ‘लॉबिंग’ केल्या जात असल्याची माहिती आहे. या समितीच्या माध्यमातून विकास कामांवर आर्थिक तरतूद केली जात असल्याने सभापती पदावर पक्षातील जबाबदार व अनुभवी सदस्याची निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.महापालिकेतील स्थायी समितीच्या माध्यमातून शहरातील विकास कामांसाठी आर्थिक नियोजन केले जाते. त्यामुळे स्थायी समितीच्या सभापती पदाला मानाचे स्थान आहे. मनपाच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमधील आठ सदस्यांना दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांना २२ फेब्रुवारीच्या सभेत निवृत्त करण्यात आले. त्यावेळी शिवसेनेच्या मंजूषा शेळके व काँग्रेसचे इरफान खान यांनी राजीनामा दिल्यामुळे एकूण १० सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये भाजपमधून पाच, शिवसेना-२, काँग्रेस-२ व राष्ट्रवादीप्रणित लोकशाही आघाडीतून एका सदस्याची निवड करण्यात आली. सभापती विशाल इंगळे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सभापतीपद रिक्त झाले आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे संख्याबळ १० असल्याने सभापती पदाची अविरोध निवड होणार, हे निश्चित आहे. यासाठी भाजपमधील काही इच्छुकांनी पक्षाकडे ‘लॉबिंग’ सुरू केल्याची माहिती आहे.भाजप ‘दे धक्का’च्या तयारीत!महापालिकेत भारतीय जनता पार्टीचे ४८ नगरसेवक आहेत. शिवणी-मलकापूर प्रभागातील नगरसेवक विशाल इंगळे यांना स्थायी समितीच्या सभापदी पदावर विराजमान करून भाजपने मनपात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबविला होता. त्यापूर्वी बाळ टाले यांना संधी देण्यात आली होती. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर सभापती पदासाठी भाजपकडून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला जाण्याची शक्यता आहे. अशावेळी महिला सदस्याचे नाव समोर येणार असल्याची चर्चा रंगली आहे.‘स्थायी’मध्ये यांचा आहे समावेशभाजप- राहुल देशमुख, विनोद मापारी, अनिल गरड, हरीश काळे, दीपाली जगताप, अर्चना मसने, शारदा खेडकर, नंदा पाटील, माधुरी मेश्राम व अनिता चौधरी.शिवसेना- मंगेश काळे, गजानन चव्हाण.काँग्रेस- फिरोज खान, जैनबबी शेख इब्राहिम.लोकशाही आघाडी - अ‍ॅड. धनश्री देव, फैयाज खान.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाBJPभाजपा