शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येणाऱ्या ५७ उंंटांना जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 07:05 IST

फूड अ‍ॅण्ड सेफ्टी स्टँडर्डस् अ‍ॅक्टनुसार उंटाचे मांस अखाद्य घोषित करण्यात आले आहे

अकोला : राजस्थानमधून तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ५७ उंटांना सोमवारी सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पातूर येथे जीवदान मिळाले. हैदराबाद येथील पशू संरक्षण समितीच्या पदाधिकाºयांनी दिलेल्या माहितीवरून पातूर पोलिसांनी उंट ताब्यात घेतले. उंटांची किंमत सुमारे ५७ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत असून, उंटांच्या तस्करीमागे आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अकोला मार्गे ५७ उंट हैदराबाद येथे नेण्यात येत असल्याची माहिती हैदराबाद येथील पशू संरक्षण समितीच्या पदाधिकाºयांना मिळाली होती. सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांनी पातूर तालुक्यातील चिचखेड फाट्यानजीक उंट ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी तक्रार देण्यासाठी पातूर पोलिस ठाणे गाठले असता पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यानंतर पशू संरक्षण समितीच्या पदाधिकाºयांनी अमरावतीच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे धाव घेतल्यानंतर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.राजस्थान सरकारने उंट हा अति संरक्षित प्राणी घोषित केला आहे. इंटरनॅशन युनियन फॉर कंझवर््हेशन आॅफ नेचर अ‍ॅण्ड नॅचरल रिसोर्सेस या आंतरराष्ट्रीय संस्थेने तर उंट हा जवळपास विलुप्त झालेला प्राणी घोषित केला आहे. उंटांच्या संरक्षणासाठी राजस्थान सरकारने २०१५ मध्ये कायदा पारित केला. तरीदेखील दरवर्षी राजस्थानातून शेकडो उंटांची पश्चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, आसाम, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये कत्तलीसाठी तस्करी केली जाते. पश्चिम बंगालमधून उंट पुढे बांगलादेशातही धाडण्यात येतात. राजस्थानातून एका उंटाची दहा ते पंधरा हजारात खरेदी केली जाते आणि कत्तलखान्यांना सुमारे एक लाख रुपयात विक्री केली जाते.यूपी, हरियाणात उंट तस्करी केंद्रेफूड अ‍ॅण्ड सेफ्टी स्टँडर्डस् अ‍ॅक्टनुसार उंटाचे मांस अखाद्य घोषित करण्यात आले आहे. भारतीय पशू कल्याण मंडळाने १४ आॅगस्ट २०१७ रोजी तसे परिपत्रकदेखील जारी केले आहे. तरीदेखील देशाच्या काही भागांमध्ये उंटाचे मांस भक्षण केले जाते आणि त्याच्या कातडीचेही विविध उपयोग आहेत. त्यामुळे उंटांना मोठी मागणी आहे. या अवैध व्यवसायात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. उत्तर प्रदेशमधील बागपत व गाझियाबाद आणि हरयाणातील मेवात ही उंट तस्करांची मोठी केंद्रे आहेत.

टॅग्स :Telanganaतेलंगणाsaleविक्रीAkolaअकोला