शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातून वर्धा येथे नेण्यात येत असलेला दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 14:46 IST

पोलिसांना पाहून दारूचे पोते फेकून दोन महिला फरार झाल्या, तर एका युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला: दारूबंदी असलेल्या वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात अकोल्यातून देशी दारूची रेल्वेने वर्धा येथे वाहतूक केल्या जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा सापळा रचून एकाला ताब्यात घेतल्यानंतर दोन महिलांनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांना पाहून दारूचे पोते फेकून दोन महिला फरार झाल्या, तर एका युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांचे पथक रामदासपेठ परिसरात गस्तीवर असताना सरकारी बगिचा येथे सायंकाळी ४ वाजता भांबुुरकर यांच्या हॉस्पिटलसमोर असलेल्या सरकारी देशी दारूच्या दुकानातून काही इसम हे दारूबंदी असलेल्या वर्धा व चंद्रपूर या ठिकाणी रेल्वेने दारू घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने भारत विद्यालय ते रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर नाकाबंदी केली असता एक दुचाकीस्वार येताना दिसून आला. त्याची दुचाकी थांबवून त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मोहम्मद वसीम शब्बीर पटेल (वय २६ वर्ष) रा. ग्राम अन्वी, ता.जि. अकोला असे सांगितले. त्याच्या जवळ असलेल्या तीन प्लास्टिक पोतड्या उघडून बघितल्या असता त्यात दारूचे ३०० क्वॉटर दिसून आले. पोलिसांनी दारू व दुचाकी असा एकूण ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सुरू असताना डोक्यावर तीन प्लास्टिकच्या पोतड्या घेऊन येताना तीन महिल्या दिसल्या. त्यांना पोलिसांची चाहुल लागताच त्या पळून गेल्या. त्यांच्या पोतड्यामधून देशी दारूचे २९६ क्वॉटर किंमत ७ हजार ६९६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून रामदासपेठ पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी