शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आरक्षणावरील स्थगिती हटवा, ६९ गावातील ग्रामस्थांचे धरणे आंदाेलन 

By राजेश शेगोकार | Updated: March 14, 2023 16:27 IST

विधान भवनाच्या प्रांगणात आमदार नितीन देशमुख आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या समर्थनार्थ  ६९ खेडेगावांतील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत. 

अकोला : महाराष्ट्र जलजीवन मिशनअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ६९ खेडीगाव पाणीपुरवठा योजनेचे आतापर्यंत ५० टक्क्यांवर काम पूर्ण झाले आहे. मात्र, तरीही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वान धरणातून पाणी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती सोमवारी न हटविल्यामुळे १४ मार्च मंगळवारी मुंबई येथे विधान भवनाच्या प्रांगणात आमदार नितीन देशमुख आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या समर्थनार्थ  ६९ खेडेगावांतील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिंदे- फडणवीस सरकारच्या निर्णयाचा विरोध करत अकोल्यातील 69 गावांसाठी प्रस्तावित असणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला दिलेल्या स्थगितीविराेधात ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केले यावेळी  शिवसेनेच्या नेत़ृत्त्वात होत असलेल्या आंदोलनात शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. या आंदाेलनाच्या मंडपात शिवसेनेच्या अनेक नेत्यांसह गावागावातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी याेजनेच्या बाजुने आक्रमकपणे भूमिका मांडल्या.   बाळापूर व अकाेला तालुक्यात पाणी टंचाई निर्माण हाेते.यासाठी जीवन मिशनअंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली. या योजनेत जल बाळापूर तालुक्यातील 53 गावे, अकोला तालुक्यातील 16 गावे अशा एकूण 69 गावांचा समावेश आहे.ठाकरे सरकारच्या काळात शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, जिल्हा परिषद गट नेते गाेपाल दातकर यांच्यासह या दाेन्ही तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात अनेक बैठका झाल्या. त्यानंतर तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात या याेजनेला सर्व मान्यता प्रदान करून निधीही मंजूर करण्यात आला. मात्र, आता पालकमंत्री स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याेजनेसाठीच्या पाण्याचे आराक्षण स्थगित ठेवण्याचा आदेश दिल्याने ६९ गावातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या धरणे आंदाेलनात जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यासह माजी आमदार गजानन दाळू गुरूजी, सेवकराम ताथोड, उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, अतुल पवनीकर, शहरप्रमुख राहुल कराळे, योगेश्वर वानखडे, उमेश भुसारी, बबलु देशमुख, उमेश जाधव, ज्ञानेश्वर म्हैसने, बाळासाहेब लांडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावेळी काॅंग्रसेचे प्रदेश प्रवक्ते डाॅ. सुधीर ढाेणे यांनीही आंदाेलनात सहभागी हाेत ग्रामस्थांना पाठींबा दिला. 

टॅग्स :AkolaअकोलाNitin Deshmukhनितीन देशमुखWaterपाणी