शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या २७ गुरांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:54 IST

त्तलीसाठी ठेवण्यात आलेल्या २७ गुरांना बार्शिटाकळी पोलिसांनी छापा टाकून  जीवनदान दिले.

अकोला : बार्शिटाकळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कसाईपूरा येथे कत्तलीसाठी ठेवण्यात आलेल्या २७ गुरांना बार्शिटाकळी पोलिसांनी छापा टाकून  जीवनदान दिले. ही कारवाई रविवारी पहाटे करण्यात आली असून या अवैधरीत्या चालविण्यात येत असलेल्या कत्तलखाण्यातून चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच ६०० कीलो मासही पोलिसांनी या ठिकाणावरुन जप्त केले.बार्शिटाकळी शहरातील कसाईपुरा येथे गुरांची मोठया प्रमाणात कत्तल करण्यात येत असल्याची माहिती बार्शिटाकळी शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार तिरुपती राणे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पडताळणी करून छापा टाकला असता कत्तलीसाठी बांधलेल्या २७ गुरांना जिवनदान दिले. सदर २७ गुरांची कींमत सुमारे चार लाख रुपयांची असून या ठिकाणावरुन ट्रक आणि इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. यासोबतच एक लाख २१ हजार रुपये कींमतीचे ६०० कीलो मासही जप्त करण्यात आले. या कारवाईत सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणच्या आरोपींविरुध्द प्राणी संरक्षण अधिनियम 1995, प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचा प्रतिबंधक कायदा 1960 तसेच भारतीय दंड विधान कलम 429 प्रमाणे पोलीस स्टेशन बार्शीटाकळी येथे एकून पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या अवैधरीत्या चालविण्यात येत असलेल्या कत्तलखाण्याचा पुढील तपास बार्शिटाकळी पोलीस करीत आहेत. ही कारवाई ठाणेदार साहायक पोलिस निरीक्षक तिरुपती अशोक राणे, एएसआय सुरेंद्र जोशी, अरुण गावंडे, एनपीसी प्रताप सिंग राठोड, अनिल गाढवे, किशोर पवार, नागसेन वानखडे, पंकज पवार, ज्ञानेश्वर गीते, सूर्यकांत डोईफोडे , सुलोचना राऊत यांनी केली. जिल्हयात कत्तलखाने जोरातजिल्हयात गुरांची अवैध तसेच निर्दयतेने वाहतुक आणि त्यांची कत्तल करणाऱ्यांचे कारखाने जोरात सुरु असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. बाळापूर, पातूर, जुने शहरातील डाबकी रोड तसेच आकोट या परिसरात गुरांची मोठया प्रमाणात कत्तल करण्यात येत आहे. मात्र पोलिसांकडून पाहीजे त्या प्रमाणात कारवाई करण्यात येत नसल्याचेही वास्तव आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी