शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कत्तलीसाठी आणलेल्या १० गुरांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 17:17 IST

अमरावती येथून ट्रकमध्ये कोंबून आणलेल्या तसेच कत्तलीसाठी ठेवलेल्या १० गुरांना पोलिसांनी जीवदान दिले.

अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजनापेठ परिसरात अमरावती येथून ट्रकमध्ये कोंबून आणलेल्या तसेच कत्तलीसाठी ठेवलेल्या १० गुरांना पोलिसांनी जीवदान दिले. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली असून, या ठिकाणावरून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.शहरातील ताजनापेठ परिसरात गुरांची कत्तल करण्यात येणार असून, ही १० पेक्षा अधिक गुरे कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्याची माहिती रामदासपेठचे ठाणेदार मुकुंद ठाकरे यांना मिळाली. त्यांनी तातडीने सदर ठिकाणावर छापा टाकून कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गुरांची सुटका केली. त्यानंतर ही गुरे गोरक्षण संस्थेत पाठविण्यात आली आहेत. अमरावती येथून अकोला शहरात ही गुरे कत्तलीकरिता आणली जात असल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर अनेक तस्करांकडून मोठ्या प्रमाणात गुरांची वाहतूक सुरू असतानाही त्याकडे पोलिसांचा कानाडोळा होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे; मात्र कारवाई करतानाही आरोपी फरार होत असल्याने या कारवाईमध्ये पोलिसांनी आणखी दक्षता बाळगण्याची गरज असल्याची मागणी गोरक्षकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी गुरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या आणि बांधून ठेवणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस