शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या वृध्दास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 5:46 PM

अकोला:  बोरगाव मंजु पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अन्वी मिर्झापूर येथील रहिवासी एका अल्पवयीन चिमुक लीवर बलात्कार करणाºया ७५ वर्षीय वृध्दास जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

अकोला:  बोरगाव मंजु पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अन्वी मिर्झापूर येथील रहिवासी एका अल्पवयीन चिमुक लीवर बलात्कार करणाºया ७५ वर्षीय वृध्दास जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच त्याला दंडही ठोठावण्यात आला असून चिमुकलीच्या आईला शिवीगाळ केल्याप्रकरणीही दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.अन्वी मिर्झापूर येथील रहिवासी अ. अजीज लालमीया देशमूख (७५) या वृध्दाने त्याच्या घराजवळच राहत असलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीवर ९ जानेवारी २०१७ रोजी जबरी संभोग केला होता. घडलेला प्रकार आई कींवा कुटुंबीयांना सांगीतल्यास चिमुकलीला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामूळे घाबरलेल्या चिमुकलीने एक दिवस हा प्रकार कुटुंबीयांना सांगीतला नाही. मात्र त्रास असहय झाल्यानंतर तीच्या आईच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बोरगाव मंजु पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी अ. अजीज लालमीया देशमूख याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ५०४, ५०६ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ५ आणि ६ नुसार गुन्हा दाखल केला होता. बोरगाव मंजु पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायालयाने ९ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी अ. अजीज लालमीया देशमूख याच्याविरुध्द आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे तसेच पोलिसांचा योग्य तपास लक्षात घेता आरोपी अ. अजीज लालमीया देशमूख याला पोक्सो कायद्याच्या कलम ५ आणि ६ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांच्या अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले. चिमुकलीच्या आईला शिवीगाळ प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.

टॅग्स :AkolaअकोलाRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयLife Imprisonmentजन्मठेप