शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाची हत्या करणाऱ्या नराधम बापास आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 14:09 IST

अकोला: डाबकी रोडवरील गजानन नगरमध्ये रहिवासी असलेल्या एका बापाने पोटच्या मुलाचा वायरने गळा आवळून हत्या केल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत शनिवारी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.

अकोला: डाबकी रोडवरील गजानन नगरमध्ये रहिवासी असलेल्या एका बापाने पोटच्या मुलाचा वायरने गळा आवळून हत्या केल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत शनिवारी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.गजानन नगरातील रहिवासी किसनराव बढे या नराधम बापाने त्याचा मुलगा प्रदीप याची वायरने गळा आवळून ११ सप्टेंबर २०१६ रोजी हत्या केली होती. प्रदीपची पत्नी गरोदर असल्याने प्रदीप स्वतंत्र खोली बांधून मागत होता. तर पिता किसनरावचा त्याला विरोध होता. किसनरावच्या मते त्याची दुसरी पत्नी म्हणजेच प्रदीपची सावत्र आई प्रदीपच्या सततच्या भांडणाने घरून निघून गेली होती. त्यामुळे किसनराव आधीच प्रदीपला त्रस्त होता. याच रात्री प्रदीपची पत्नी माहेरी असल्याने घरी बापलेकांशिवाय कोणीच नव्हते. त्यामुळे प्रदीपची हत्या करण्याची हीच संधी सापडल्याने किसनरावने मुलाच्या गळ्याला वायर आवळली. गळफास बसल्याने प्रदीपचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसºया दिवशी सकाळी प्रदीपचा दारू पिल्याने मृत्यू झाल्याची माहिती प्रदीपच्या पत्नीला आणि बहीणीला कळवण्यात आली होती. मुलाच्या अंत्यसंस्काराचीही तयारी करून ठेवण्यात आली; मात्र मुलगा प्रदीप याची आंघोळ घालताना त्याच्या गळ्यावर व्रण दिसल्याने अनेकांना शंका आली. लगेच प्रदीपच्या मित्रांनी पोलिसांना कळवले. जुने शहर पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळावर पोहचले. त्यांना शंका आल्याने त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात नेला. तेथे उत्तरीय तपासणी झाल्यानंतर प्रदीपचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाले. नंतर प्रदीपची पत्नी संगीताच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून तपास केला. यामध्ये प्रदीपच्या वडिलानेच खून केल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपी किसनराव याला अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने या खटल्यात आठ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी किसनरावला ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्याची शिक्षा ठोठावली.

 

टॅग्स :AkolaअकोलाLife Imprisonmentजन्मठेपCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय