शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात साकारणार ‘लायब्ररी ऑफ कॉन्स्टिट्यूशन’

By atul.jaiswal | Updated: August 23, 2020 10:16 IST

जगभरातील देशांच्या राज्यघटनांच्या प्रति एकाच छताखाली आणण्याचा उपक्रम अकोला येथील विश्वास प्रतिष्ठानने हाती घेतला आहे.

ठळक मुद्देराज्यघटनांचे ग्रंथालय जेआरडी टाटा इंटरनॅशन स्कूल येथे होणार आहे.सदस्यांनी विविध देशांच्या राज्यघटना संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.

- अतुल जयस्वाल लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : इतिहास संशोधक व इतरांना राज्यघटनांचा अभ्यास करता यावा, तसेच संदर्भ मिळविणे सुलभ व्हावे, यासाठी जगभरातील देशांच्या राज्यघटनांच्या प्रति एकाच छताखाली आणण्याचा उपक्रम अकोला येथील विश्वास प्रतिष्ठानने हाती घेतला आहे. ‘अकोला स्कूल आॅफ हिस्टरी’ अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, या अंतर्गत अकोल्यात ‘लायब्ररी आॅफ कॉन्स्टिट्यूशन’ अर्थात राज्यघटनांचे ग्रंथालय साकारण्यात येणार आहे.आधुनिक जगात विविध देशांनी त्यांचा राज्यकारभार हाकण्यासाठी लिखित स्वरूपातील राज्यघटनांचा अवलंब केला आहे. जगभरातील कायदे तज्ज्ञ, इतिहास संशोधक, राज्यशास्त्राचे अभ्यासक व विद्यार्थ्यांना विविध संदर्भांसाठी राज्यघटनांचा आधार घ्यावा लागतो. विविध देशांच्या राज्यघटनांच्या प्रति मोठ-मोठ्या ग्रंथालयांमध्ये एकाच ठिकाणी अभावानेच मिळतात. त्यामुळे अभ्यासकांना अडचणीचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर करण्याच्या उद्देशाने अकोला येथील विश्वास प्रतिष्ठानने ‘अकोला स्कूल आॅफ हिस्टरी’ अंतर्गत ‘लायब्ररी आॅफ कॉन्स्टिट्यूशन’ स्थापन करण्याचे ठरविले असून, त्या दिशेने पाऊल उचलले आहे. विश्वास प्रतिष्ठानच्या सदस्यांनी विविध देशांच्या राज्यघटना संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.यासाठी ज्यांच्याकडे राज्यघटना असतील, त्यांनी त्या पाठवाव्यात, असे आवाहन ई-मेल व व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून केले आहे. प्रतिष्ठानचे प्रशांत गावंडे यांनी आतापर्यंत ९०० जणांना ई-मेल पाठविले असून, त्यांना सकारात्मक प्रतिसादही मिळाल्याचे ते सांगतात. आतापर्यंत जापान, आॅस्ट्रेलिया, फिनलँड, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, भारत व पाकिस्तानच्या राज्यघटनांच्या प्रति देण्याचे संबंधितांनी कबूल केले असून, लवकरच या राज्यघटनांच्या प्रति प्राप्त होणार असल्याचे प्रशांत गावंडे यांनी सांगितले.

दूतावासांसोबतही साधणार संपर्कराज्यघटनांच्या प्रति संकलीत करण्याच्या उद्देशाने विश्वास प्रतिष्ठानचे सदस्य पुढील महिन्यात विविध देशांच्या दूतावासांना भेटी देऊन, त्यांच्याकडून त्यांच्या देशाच्या राज्यघटनांच्या प्रति मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याशिवाय विविध देशांमधील परिचितांकडूनही राज्यघटनांच्या प्रति मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सुरुवातीला राज्यघटनांचे ग्रंथालय जेआरडी टाटा इंटरनॅशन स्कूल येथे होणार आहे. त्यानंतर यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

राज्यघटनांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एकाच छताखाली विविध देशांच्या राज्यघटना उपलब्ध असाव्या, या कल्पनेतून हा प्रकल्प हाती घेतला आहे. अभ्यासकांना त्याचा निश्चितच फायदा होईल. कुणाकडे एखाद्या देशाची राज्यघटना असेल, तर ती आम्हाला पाठवून या कामात आमची मदत करावी.- प्रशांत गावंडे,विश्वास प्रतिष्ठान, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाConstitution Dayसंविधान दिनlibraryवाचनालय