शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

शाडू मातीचा गणपती बनवूया; पर्यावरणाचे रक्षण करूया -  जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 12:37 IST

अकोला : ‘शाडू मातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करूया’, असा मंत्र देत यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी केले.

अकोला : ‘शाडू मातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करूया’, असा मंत्र देत यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी केले.लोकमत बाल विकास मंच व साम अ‍ॅकॅडमीच्यावतीने अकोला शहरातील जानोरकर मंगल कार्यालय येथे आयोजित ‘ईको फ्रेंडली’ गणेशमूर्ती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दीपप्रज्वलन करून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी राजेश खवले, स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या मुख्याध्यापिका रश्मी गायकवाड, साम अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत चौथे, संचालक प्रा. सागर चौथे, लोकमत अकोला आवृत्तीचे युनिट हेड आलोककुमार शर्मा, लोकमत अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले उपस्थित होते. पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करण्याचे सांगत, कार्यशाळेत उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मित्रांनाही ईको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवायला शिकवून पर्यावरण रक्षणाची जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर लोकमत बाल विकास मंच व साम अ‍ॅकॅडमीच्यावतीने आयोजित ईको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी कौतुक केले. यावेळी लोकमत अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले यांनी विचार मांडले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने ‘लोकमत’च्यावतीने ईको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सागर चौथे, संचालन सुप्रिया पडगीलवार यांनी केले. ईको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.रविवार सुटीचा दिवस आणि रिपरिप पाऊस सुरू असतानाही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह पालकांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवित गर्दी केली. कार्यशाळेचे प्रशिक्षक म्हणून प्रा. सागर चौथे यांनी उपस्थितांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनवायला शिकविले. कार्यशाळेत सहभागी चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही गणेशमूर्ती साकारल्या. शाडू मातीपासून पर्यावरणपूरक लाडक्या बाप्पांची मूर्ती स्वत:च्या हाताने साकारल्याचा आनंद कार्यशाळेत सहभागी बालगोपालांच्या चेहºयावर ओसंडून वाहत होता.जिल्हाधिकाºयांनी साकारली ‘ईको फ्रेंडली ‘गणेशमूर्ती!कार्यशाळेत सहभागी चिमुकल्यांसोबतच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनीही शाडू मातीपासून स्वत: गणेशमूर्ती साकारून उपस्थितांना प्रोत्साहित केले.

चिमुकल्यांसोबत आई-वडिलांनीही साकारल्या ‘बाप्पां’च्या मूर्ती!ईको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेत सहभागी चिमुकल्यांनी शाडू मातीपासून बाप्पांच्या मूर्ती साकारल्या. तसेच विद्यार्थ्यांसोबतच आई-वडिलांनीही बाप्पांच्या ईको फ्रेंडली मूर्ती साकारल्या. गणेशमूर्ती साकारताना चिमुकल्यांसोबतच आई-वडीलही मग्न झाले होते.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ!ईको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थ्यांनी यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची शपथ घेतली.ईको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा या पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात गत पाच वर्षांपासून लोकमत बाल विकास मंच व साम अ‍ॅकॅडमीच्यावतीने करण्यात आली. या कार्यशाळेच्या माध्यमातून ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’ची मूर्ती न वापरता पूर्णपणे पर्यावरणपूरक शाडू मातीची गणेशमूर्ती बसवून, पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा आमचा उद्देश आहे.-प्रा. सागर चौथे,संचालक, साम अ‍ॅकॅडमी व इरा किड्स स्कूल, अकोला.लोकमत बाल विकास मंच नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास सहकार्य मिळते. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा यासारख्या स्तुत्य उपक्रमाने नक्कीच विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्येही पर्यावरणासंदर्भात जनजागृती होईल.-रश्मी गायकवाड,मुख्याध्यापिका, स्कूल आॅफ स्कॉलर्स, बिर्ला गेट, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाLokmat Eventलोकमत इव्हेंटGanpati Festivalगणेशोत्सव