शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याची कातडी जप्त; तिघांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 06:48 IST

केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे येथील पथकाची कारवाई

अकोला : बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अकोट तालुक्यातील जंगलात केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे येथील पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली असून, आरोपींना अकोट व अकोला वनविभागाकडे पुढील तपासासाठी सोपविले आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, अकोट, अकोला जिल्ह्यातील काही व्यक्ती बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती डीआरआयच्या पुणे येथील पथकाला मिळाली होती. त्यानुसार डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून कारवाई केली आणि अकोटच्या जंगलात पाठलाग करून तीन आरोपींना बिबट्याच्या कातडीसह अटक केली. वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ नुसार वन्य प्राण्यांची शिकार करून कातडी व वन्य प्राण्यांचे कोणतेही अंगाची तस्करी करणे गुन्हा आहे. बिबट्या हा अधिनियमाच्या अनुसूची-१ मध्ये समाविष्ट असून, बिबट्याच्या कातडीचा व्यापार, खरेदी-विक्री किंवा मालकी बाळगणे कठोरपणे प्रतिबंधित आहे.

बिबट्याचे कातडे जप्तपुणे येथील डीआरआयच्या पथाने केलेल्या या कारवाईत तीन व्यक्तींना पकडण्यात आले. त्यात दोन वाहक आणि एका मध्यस्थाचा समावेश आहे. त्यांच्याकडून ८०.५ इंच बाय २५ इंच आकाराचे एक बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले. वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेली कातडी आणि अटक करण्यात आलेले तीन आरोपी पुढील तपासासाठी अकोला जिल्हा वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

तस्करांवर कारवाई करणारा विभागकेंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालय हे केंद्र सरकारच्या राज्यस्व विभागांतर्गत काम करते. जीएसटी विभागासोबत समन्वय ठेवून काम करणाऱ्या केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे येथील पथकाला वन्यजीवाच्या कातडीची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे ही कारवाई अकोला जिल्ह्यात करण्यात आली असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Akolaअकोलाleopardबिबट्या