शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील बिबट मृतावस्थेत आढळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 16:22 IST

अकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागांतर्गत धारगड परिक्षेत्रात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे.

- विजय शिंदेअकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोटवन्यजीव विभागांतर्गत धारगड परिक्षेत्रात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना २ जून रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, मृत्यूचे कारण शोधण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी जंगलात रवाना झाले होते.अकोटलगत मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अतिसंरक्षित आहे. या अकोट वन्यजीव विभागातील धारगड वनपरिक्षेत्र अंतर्गत गुरगीपती वर्तुळ अंतर्गत खंड क्रमांक ९१४ मध्ये वन कर्मचाऱ्यांना रविवारी गस्ती दरम्यान बिबट अर्धवट कुजलेल्या स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी, वन कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांनी धारगड जंगलात जाऊन शवविच्छेदन केल्याची माहिती समोर येत आहे.बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने किमान तीन ते चार दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बिबट्याचा मृत्यू पाण्याअभावी की उष्मघातामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मेळघाट क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी बिबट मृत्यूप्रकरणी सविस्तर अहवाल मागविला असल्याचे कळते.मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित भागात तसेच प्रकल्पाच्या बाहेर वाघ, बिबट मृतावस्थेत आढळून येण्याच्या घटना वाढत आहेत. गत काही महिन्यांपासून ३ वाघ व ३ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश मृत्यूचे कारण नैसर्गिक असल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु या मृत्यूच्या घटना वन्य जीवप्रेमींमध्ये चिंताजनक ठरत आहेत. अकोट वन्यजीव विभाग धारगड परिक्षेत्रातील जंगलात बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे. आमचे वनाधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी जंगलात पाठविण्यात आले आहे. सध्यातरी मृत्यूचे नेमके कारण सांगता येणार नाही.-ओ. टी. बेऊला,उपवनसंरक्षक,वन्यजीव विभाग अकोट.

 

टॅग्स :MelghatमेळघाटMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पAkolaअकोलाakotअकोटwildlifeवन्यजीव