शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्याच्या पायथ्याशी शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 14:21 IST

सुटका करताना तडफडून मृत्यू

- विजय शिंदेअकोटः मेळघाट व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या सातपुड्याच्या जंगलात बिबट्याची शिकार करण्यासाठी लावण्यात आलेल्या फासकीत अडकल्याने बिबट्याचा मृत्यू झाला आहे. फासकीतून सुटका करुन घेण्यासाठी धडपडत असताना बिबट्याने जीव गमावला. सातपुड्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात बिबट्या, वाघ आणि इतर वन्य प्राणी आहेत. विविध कारणांमुळे बिबट्या, वाघ हे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नदी, नाले आणि गाव-वस्त्यांकडे धाव घेत आहेत. तेल्हारा तालुक्यातील खंडाळा गावाच्या लगत सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जमुना नदीमध्ये शिकार्‍यांनी बिबट्याच्या शिकारीसाठी फास लावला होता. त्यामध्ये बिबट्या अडकला. या फासातून सुटका करून घेण्यासाठी धडपड करत असताना बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्याच्या मृत्यूबद्दल वन विभागानं कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या घटनेमुळे बिबट्या, वाघाचे अधिवास क्षेत्र शिकाऱ्यांना माहीत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. बिबट्याचा मार्ग, त्या मार्गावरुन येण्याची त्यांची वेळ याची अचूक माहिती शिकाऱ्यांकडे असल्याचे याआधीही वारंवार अधोरेखित झाले होते. आतापर्यंत या भागात  मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. 

टॅग्स :leopardबिबट्या