शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या ‘त्या’ बछड्यांना ११ दिवसांपासून आईची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 10:51 IST

११ दिवस उलटूनही बिबट मादी बछड्यांकडे परतली नाही.

ठळक मुद्देबिबट मादीची दररोज रात्रंदिवस वाट पाहिली जात आहे. बिबट मादी परतली नाही तर तिच्या बछड्यांना नागपूरला हलविण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : मोर्णा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पास्टुल येथील गावकऱ्यांना ३० जून दुपारी २ वाजता बिबट्याचे तीन बछडे आढळून आले होते. हे बछडे वन विभागाने ताब्यात घेतले आणि काही दिवसांपासून जंगलातच ठिय्या देऊन बिबट मादीची प्रतीक्षा करीत आहेत; परंतु ११ दिवस उलटूनही बिबट मादी बछड्यांकडे परतली नाही. त्यामुळे बछड्यांना कसे सोडावे, अशी अशी चिंता वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सतावत आहेत.पास्टुल गावाच्या नदीच्या झुडपाजवळ ३० जून रोजी बिबट्याचे तीन बछडे गावकºयांना दिसले होते. गावकºयांनी ही माहिती पातूर वन विभागाला दिली. वन विभागाने त्या ठिकाणी धाव घेत, बिबट्याच्या बछड्यांना ताब्यात घेतले; परंतु बछड्यांना जन्म देणारी बिबट मादी दिसून न आल्यामुळे वन विभागाने या ठिकाणी बछड्यांसह बिबट मादीच्या प्रतीक्षेत ठिय्या दिला आहे. अकरा दिवस उलटूनही बिबट मादी परतली नाही. वन विभागाचे अधिकारी चातकासारखी बिबट मादीची वाट पाहत आहे. बिबट मादीची दररोज रात्रंदिवस वाट पाहिली जात आहे. वन विभागाचे कर्मचारी दूध पाजून बछड्यांना जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. बिबट मादी परतली नाही तर तिच्या बछड्यांना नागपूरला हलविण्यात येणार आहे. आणखी दोन दिवस या ठिकाणी बिबट मादीची प्रतीक्षा केली जाईल. त्यानंतरही मादी बछड्यांच्या ओढीने परतली नाही तर बछड्यांना नागपूरला सोडण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून वन विभागाचे वरिष्ठ स्तरावरील अधिकारी या ठिकाणी भेटी देत आहेत; मात्र त्याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.त्यामुळे बिबट मादी परतत नसल्याचे जाणकारांचे मत!माणसांचा स्पर्श बछड्यांना झाल्यामुळे बिबट मादी, त्या तीन बछड्यांकडे परत येत नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. बिबट्याच्या बछड्यांबाबत वन विभाग कमालीची गुप्तता पाळत आहे. अकरा दिवसांपासून या तीनही बछड्यांची बिबट मादी त्यांना घ्यायला आली किंवा नाही, याबाबत नागरिकांमध्येही उत्सुकता आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवPaturपातूरAkolaअकोला