शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

कायद्याची गुंतागुंत बाल कामगारांच्या जीवावर

By admin | Updated: June 12, 2014 20:31 IST

बालकामगारांच्या वयासंदर्भात कायद्याची मोठी गुंतागुंत असल्याने बालकामगार ठेवणार्‍यांवर कारवाई होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

अकोला : ह्यमुले देवाघरची फुलेह्ण असे मोठय़ा कौतुकाने म्हटल्या जाते; मात्र याच बालकांचा कायद्याच्या गुंतागुंतीमुळे धोकादायक कामांसाठी मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येत आहे. बालकामगारांच्या वयासंदर्भात कायद्याची मोठी गुंतागुंत असल्याने बालकामगार ठेवणार्‍यांवर कारवाई होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. कामगार आयुक्त कार्यालयाकडून मागील वर्षभरात टाकण्यात आलेल्या धाडसत्रात केवळ ८ ते ९ दुकान मालकांवर कारवाई करण्यात आली आहे.भारताच्या राज्यघटनेनुसार १४ वर्षाआतील मुले ही बालके आहेत. या वयाच्या आतमध्ये असलेल्या मुलांना कामावर ठेवल्यास त्यांच्यावर बालकामगार कायद्यानुसार कारवाई करण्यात येते; मात्र १९९२ मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय बालहक्क संहितेवर स्वाक्षरी केली असून, या संहितेमधील १९८९ च्या कलम १ अन्वये १८ वर्षाआतील मूल हे बालक आहे. एखाद्या दुकानामध्ये बालकामगार काम करीत असल्याची माहिती कामगार आयुक्तांना मिळाली आणि त्यांनी संबंधित ठिकाणावर धाड टाकल्यानंतर सदर बालकामगार १४ वर्षाच्या आत असल्यास कारवाई करण्याचे अधिकार कामगार आयुक्तांना आहेत; मात्र बालकामगार १४ वर्षाच्या वर असल्यास त्यावर कारवाई करण्यास मोठी अडचण आहे. १४ ते १६ वयोगटातील अनेक मुले बालकामगार म्हणून काम करीत आहेत; मात्र विविध कायद्यांमधील वयाच्या गुंतागुंतीमुळे बालकामगार ठेवणार्‍यांवर कारवाई करण्यास संबंधित यंत्रणेलाही अडचणी निर्माण होत आहेत. मागील वर्षभरामध्ये बालकामगार ठेवणार्‍या ठिकाणांवर धाडसत्र करण्यात आले; मात्र कारवाईचे प्रमाण अल्प असल्याचे समोर आले आहे.