शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

एलबीटी कर्मचार्‍यांचे गुटखा माफियांसोबत ‘कनेक्शन’

By admin | Updated: September 5, 2014 01:33 IST

अकोल्यात गुटख्याची कोट्यवधीची उलाढाल; एलबीटीचा पत्ता नाही!

अकोला : एलबीटी रद्द होण्याच्या शक्यतेने व्यापार्‍यांनी एलबीटी जमा करण्यास आखडता हात घेतल्याची ओरड प्रशासनाकडून होत असली तरी वसुलीत घसरण होण्यासाठी दुसरेच कारण समारे आले आहे. गुटख्याची साठवणूक व विक्रीवर कडक निर्बंंंध असतानादेखील, शहरात महिन्याकाठी कोट्यवधीच्या किमतीचा गुटखा विक्री होत आहे. मनपाच्या एलबीटी विभागातील एका कर्मचार्‍याचे गुटखा माफियांसोबत ह्यकनेक्शनह्ण असून याबदल्या त महिन्याकाठी मोठा हप्ता वसुल केल्या जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. जकात रद्द करून शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू केला. एलबीटीमुळे मनपाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल, असा आशावाद होता. परंतु महापालिकेच्या प्रामाणिक अधिकार्‍यांनी व्यापारीच एलबीटीची नोंदणी व कर जमा करण्यास उत्सुक नसल्याची दवंडी पिटली. व्यापार्‍यांच्या आड संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी काही व्यापार्‍यांसोबत हातमिळवणी करीत हप्ता वसुलीचा कार्यक्रम सलग चार महिने राबवला. शहरातील काही होलसेल व्यावसायीकांच्या नोंदणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. हा सर्व प्रकार मध्यंतरी मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी स्वत: काही व्यापारी प्रतिष्ठानांची तपासणी केल्यावर उघड झाला होता, हे येथे उल्लेखनीय. यादरम्यान, एलबीटी विभागाची सूूत्रे उ पायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्याकडे सोपवण्यात आली आणि तीन कोटींच्या उत्पन्नाने चार ते सव्वाचार कोटीचा आकडा ओलांडला. असे अस तानासुद्धा काही कर्मचार्‍यांची दुकानदारी एकदम जोरात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शहरात गुटख्याची साठवणूक व विक्रीवर कडक निर्बंंध असताना बाजारात कोट्यवधीच्या किमतीची उलाढाल सुरू आहे. जकात वसुलीच्यावेळी शहरात कोणते व्यावसायिक गुटखा माफिया आहेत, याची इत्थंभूत माहिती एलबीटी विभागातील दोन कर्मचार्‍यांना आहे. गुटख्याची विक्री होत असली तरी त्याचा अधिकृत एलबीटी जमा होत नसल्याची बाब संबंधित मनपा कर्मचार्‍यांच्या पथ्यावर पडली आहे. मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या नाकाखाली टिच्चून संबंधित गुटखा माफियांकडून महिन्याकाठी ४0 ते ५0 हजारांचा हप्ता वसूल केला जात आहे. हा प्रकार एलबीटी विभागातील कर्मचार्‍यांना ज्ञात असल्याने यावर आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. ** या भागातून वसुलीकाश्मीर लॉज परिसर, श्रावगी टॉवर परिसर, सिंधी कॅम्पस्थित कच्ची खोली, जनता कापड बाजार, रेल्वे स्टेशन चौकातील गुटखा माफीयांकडून महिन्याकाठी हप्ता वसूल केला जात आहे.** अन्न व औषधी प्रशासन विभागाचे झोपेचे सोंगशहरात रेडीमेड ड्रेस व कापड विक्रीचा व्यवसाय करणारे व्यावसायिक गुटखा विक्रीचासुद्धा काळाबाजार करतात. काही महिन्यांपूर्वी शहरालगतच्या फार्म हाऊसमधून कोट्यवधी किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला होता. हा सर्व माल मध्य प्रदेश मार्गे रेल्वेद्वारे शहरात दाखल होत असल्याची इत् थंभूत माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे आहे. मोठय़ा पान टपर्‍यांसह चिल्लर टपर्‍यांवरदेखील खुलेआमपणे गुटख्याची विक्री होत असल्याने या प्रकाराला अन्न व औषधी प्रशासन विभागाची मूकसंमती असल्याचे दिसून येते.