शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त लिपिकाकडून पोलिसांना कायद्याचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 14:33 IST

अकोला: पोलीस प्रशिक्षण केंद्रातून सेवानिवृत्त झालेल्या एका वरिष्ठ लिपिकाकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस कार्यप्रणालीतील बारकावे आणि संविधानातील महत्त्वपूर्ण विषयावर कायदेशीर धडे गिरवित आहेत.

- संजय खांडेकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पोलीस प्रशिक्षण केंद्रातून सेवानिवृत्त झालेल्या एका वरिष्ठ लिपिकाकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस कार्यप्रणालीतील बारकावे आणि संविधानातील महत्त्वपूर्ण विषयावर कायदेशीर धडे गिरवित आहेत. राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणाºया महादेवराव नवरखेडे या तज्ज्ञ अभ्यासकाची महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकॅडमीकडून दखल घेत त्यांचा गौरव केला आहे.अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून सेवा देत असतानाच नवरखेडे यांचे नाव लौकिक झाले होते. आयपीएस असो की आयएएस अधिकारी, त्यांच्यासमोर न घाबरता आपल्या सहकाऱ्यांवरील अन्यायाच्या चौकशीत (डीईत) ते बाजू मांडायचे. त्यामुळे नवरखेडे यांच्यातील तज्ज्ञ अभ्यासक अल्पावधीत राज्यभरात सुपरिचित झाला. त्यानंतर आयएएस आणि आयपीएस अधिकाºयांनीच नवरखेडे यांच्या व्याख्यानाचे वर्ग कर्मचारी आणि अधिकाºयांना देणे सुरू केले. त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेत नवरखेडे आता राज्यातील अधिकाºयांना सातत्याने मार्गदर्शन करीत आहे.राज्यातील पोलीस उपअधीक्षक पदाच्या पदोन्नतीच्या कक्षेत असलेल्या ४६ पोलीस निरीक्षकांना नवरखेडे २४ ते ६ जुलैपर्यंतच्या कार्यकाळात मार्गदर्शन करून आले आहे. महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकॅडमी, नाशिकच्या वतीने हे प्रशिक्षण घेण्यात आले होते. राज्याच्या विविध ठिकाणाहून आलेल्या या पोलीस अधिकाºयांना सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक नवरखेडे यांनी कायद्याचे धडे दिलेत. दोन आठवड्यांच्या सेवाअंतर्गत प्रशिक्षण सत्रात त्यांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद क्रमांक ३११ (२)अ,ब,क तसेच पोलीस अधिकारी यांच्या कक्षा, कारवाई आणि नियम यातील बारकाव्यासंदर्भात मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणानंतर नवरखेडे यांना ताम्रपत्र आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस