शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात गारपिटीनं हरभरा, तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 11:31 IST

जिल्ह्यात रविवारी सकाळी गारपीट झाल्याने हरभरा पिकासह रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळी 6 वाजतापासून तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, सौन्दला, सिरसोली, आडगाव परिसरात विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली, गारपीट झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.

अकोला - जिल्ह्यात रविवारी सकाळी गारपीट झाल्याने हरभरा पिकासह रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळी 6 वाजतापासून तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, सौन्दला, सिरसोली, आडगाव परिसरात विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली, गारपीट झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.  गत दोन- चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. रविवारी सकाळच्या सुमारास काही भागात अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकऱ्यांवर जणू आभाळच कोसळले.वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने उरलासुरला रब्बी हंगामही हातचा जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढल्याने फळबागा आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोट, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यातही काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस झाला, वादळी पाऊस झाला. पाऊस आणि गारपीट झालेल्या भागातील पिके जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पावसाचा सर्वधिक फटका सोंगणी करून ठेवलेल्या हरभरा पिकला बसला आहे.तसेच तूर, गहू, फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतक-यांची तारांबळसध्या हरभरा काढणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतात पडलेला आहे. अचानक गारपीट व अवकाळी पाऊस पडल्या मुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.

टॅग्स :Akola cityअकोला शहर