शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील भूमी अभिलेख विभागाला रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 15:20 IST

अकोला: समृद्धी महामार्ग, स्मार्ट सिटीसह विविध प्रकल्प तसेच फेरफार व पुनर्विलोकन अर्ज व अपील अर्जांची शेकडो कामे असलेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील भूमी अभिलेख विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.

ठळक मुद्देनागपूरमधील भूमी अभिलेख कार्यालयात ३०, अकोल्यात ८, वाशिम ३, बुलडाणा ९, यवतमाळ ३, अमरावती ५ पदे रिक्त आहेत.वर्ध्यात ७, चंद्रपूर ४, भंडारा ६, गोंदिया ३, गडचिरोली येथेही पदे रिक्त असून, या रिक्त पदांचा भार कर्मचाºयांवर येत आहे. नागपूरमधील नगर भूमापान क्रमांक २ येथे महिन्याला तब्बल अडीच हजारांवर विविध स्वरूपाचे अर्ज दाखल होतात.

- सचिन राऊत

अकोला: समृद्धी महामार्ग, स्मार्ट सिटीसह विविध प्रकल्प तसेच फेरफार व पुनर्विलोकन अर्ज व अपील अर्जांची शेकडो कामे असलेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील भूमी अभिलेख विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. रिक्त पदांमुळे भूमी अभिलेख विभागातील कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली असून, या कार्यालयांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होत असल्याने वरिष्ठ अधिकाºयांनी ही पदे भरण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.विदर्भात नागपूरमधील भूमी अभिलेख कार्यालयात ३० च्या वर पदे रिक्त असून, अकोल्यात ८, वाशिम ३, बुलडाणा ९, यवतमाळ ३, अमरावती भूमी अभिलेख कार्यालयातही ५ पदे रिक्त आहेत. यासोबतच वर्ध्यात ७, चंद्रपूर ४, भंडारा ६, गोंदिया ३, गडचिरोली येथेही पदे रिक्त असून, या रिक्त पदांचा भार कर्मचाºयांवर येत आहे. विदर्भातील अनेक कर्मचाºयांच्या बदल्या झाल्या असून, काहींना प्रतिनियुक्तीवर घेण्यात येत आहे; मात्र संबंधित कार्यालयातून त्यांना कार्यमुक्त करण्यात येत नसल्याचे वास्तव असून, वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अडीच हजारांवर अर्जांची आवकनागपूरमधील नगर भूमापान क्रमांक २ येथे महिन्याला तब्बल अडीच हजारांवर विविध स्वरूपाचे अर्ज दाखल होतात. २४ मौजे असलेल्या या कार्यालयात हे अर्ज निकाली काढण्यासाठी दोन मुख्यालय सहायकांची पदे आहेत; मात्र ही दोन्ही पदे रिक्त आहेत. त्यानंतर परीरक्षण भूमापकांची १२ पदांची आवश्यकता असताना येथे केवळ ३ कर्मचारी कार्यरत आहेत. कनिष्ठ लिपिकांची बदली झाल्याने एक ते दोनच लिपिक कार्यरत आहेत. विशेष म्हणजे नागपूरसारख्या या मोठ्या शहरातील कार्यालयात एकही शिपाई नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कर्मचाºयांवर प्रचंड ताण येत असून, नागरिकांचीही कामे होत नसल्याचे दिसून येत आहे. भूमी अभिलेख विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दोन स्वतंत्र कार्यालयांचा प्रस्ताव धूळ खातअकोला तालुका भूमी अभिलेख व अकोला शहरासाठी नगर भूमापन कार्यालय अशी स्वतंत्र दोन कार्यालये असायला हवी; मात्र अकोला तालुका भूमी अभिलेख कार्यालयातच तालुका व शहराचा भार असल्याने नागरिकांची कामे तातडीने मार्गी लागत नाहीत. तालुका भूमी अभिलेख कार्यालयाद्वारे नगर भूमापन कार्यालयाचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आलेला आहे; मात्र त्यावर अद्यापही निर्णय झालेला नसल्याने भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार प्रचंड अडचणीत करावा लागत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भ