शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

अकोला ‘एमआयडीसी’तील भूखंड घोटाळे पोहोचले मुंबईत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:15 IST

अकोला : अकोला ‘एमआयडीसी’तील भूखंड घोटाळे अधिकारी आणि दलालांच्या संगनमताने झाले असून यामध्ये मुंबई व अमरावतीमधील  तीन वरिष्ठ अधिकारी आणि अकोला एमआयडीसी प्लॉट ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी गुंतल्याची निनावी तक्रार मंत्रालयात पोहचली आहे. या तक्रारीवर सरकारदरबारी काय निर्णय होतो, याकडे येथील उद्योजकांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देदलाल-अधिकार्‍यांचे संगनमत प्लॉट ओनर्स असोसिएशनवर आरोप

संजय खांडेकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला ‘एमआयडीसी’तील भूखंड घोटाळे अधिकारी आणि दलालांच्या संगनमताने झाले असून यामध्ये मुंबई व अमरावतीमधील  तीन वरिष्ठ अधिकारी आणि अकोला एमआयडीसी प्लॉट ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी गुंतल्याची निनावी तक्रार मंत्रालयात पोहचली आहे. या तक्रारीवर सरकारदरबारी काय निर्णय होतो, याकडे येथील उद्योजकांचे लक्ष लागले आहे.                                                                   अकोला एमआयडीसीतील प्लॉट नं. टीए-६0, टीएम -२४, टीएम -६२, टीएम १३७, टीएम-२३७ या वरील बांधकाम अवैध सुरू होते. जेव्हा टीए-६0 च्या बांधकामावर आक्षेप घेत कारवाई सुरू झाली, तेव्हा एमआयडीसीतील प्लॉट ओनर्स असोसिएशनने अमरावतीच्या अधिकार्‍यावर दबाव आणून इतर प्लॉटवरील अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले. यासाठी प्रादेशिक अधिकार्‍यांना धमक्यादेखील दिल्या.यामध्ये एका लोकप्रतिनिधीची साथही या असोसिएशनला मिळाली. अमरावतीच्या विभागीय कार्यालयात जाऊन या असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी गोंधळ घातला, असे मुंबईत पाठविण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.  एमआयडीसीचे माजी मुख्य अधिकारी जे अकोल्याचे जावईदेखील आहेत, त्यांच्या नावाचा थेट उल्लेखही तक्रारीत आहे.   एमआयडीसीतील ओपन स्पेस नं. टी-४२ ला बदलण्यासाठी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी मोठी रक्कम घेतल्याचाही आरोप असून ५0-६0 लाख रुपये देणार्‍यांना पाहिजे तो भूखंड वितरित केला करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची  तसेच असोसिएशनचे पदाधिकारी आणि तीन वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. 

उद्योग संजीवनी योजनेचा दुरुपयोगअकोल्यातील असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनीआपल्या पदाचा दुरुपयोग करुन  उद्योग संजीवणी योजनेमध्ये काही उद्योजकांना महत्वाचे भूखंड  मिळवून दिले. या माध्यमातून २0 कोटी रुपयांची माया गोळा केल्याचा गंभीर आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे.  

चौकशीसाठी आम्ही तयार !मुंबईत पोहोचलेल्या तक्रारीतील आरोप बिनबुडाचे आणि निराधार आहेत. व्यक्तिगत आणि असोसिएशनचे पदाधिकारी म्हणून आम्ही कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत.-सुरेश काबरा, अध्यक्ष, एमआयडीसी प्लॉट ओनर्स असोसिएशन, अकोला.

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळMumbaiमुंबई