शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

अकोला, बार्शीटाकळी तालुक्यात लम्पीचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 10:57 IST

Akola News : जिल्ह्यातील गोवंशांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘लम्पी’ या त्वचा विकाराची लक्षणे दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात गोवंशावर ‘लम्पी’ या त्वचा विकाराचा प्रादुर्भाव झाला आहे. आजारी गोवंशांचे नमुने ‘रिजनल डिसीस इन्व्हेस्टिगेशन लॅब’ने तपासणीसाठी भोपाळ येथे पाठविले होते. यातील अकोला आणि बार्शीटाकळी तालुक्यातील गोवंशांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्ह्यात सर्वत्र लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.जिल्ह्यातील गोवंशांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘लम्पी’ या त्वचा विकाराची लक्षणे दिसून येत आहेत. या आजारामुळे गोवंशाच्या शरीरावर अचानक सूज येत असून, हलका ताप आणि सर्दीही आढळून येत आहे. तसेच गोवंशाच्या शरीरावर गाठीदेखील आढळून येत आहेत. हा संसर्गजन्य आजार असून, संक्रमित पशूंच्या संपर्कात आलेल्या पशूंना त्यापासून धोका संभवू शकतो. जिल्ह्यात लम्पीच्या वाढत्या प्रादुभार्वाच्या तक्रारीनंतर पशू विभागातर्फे जिल्ह्यातील ३३ नमुने वैद्यकीय तपासणीसाठी भोपाळ येथील ‘हाय सिक्युरिटी अ‍ॅॅनिमल डिसीज लॅब’मध्ये पाठविण्यात आले होते. यातील काही नमुन्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. यामध्ये अकोला आणि बार्शीटाकळी तालुक्यातील गोवंशाचा समावेश आहे. तर अकोला आणि तेल्हारा तालुक्यातील गोवंशांच्या नमुन्याच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा कायम आहे. ज्या गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव आढळला आहे, अशा गावांमध्ये शून्य ते पाच किलोमीटर अंतरावरील पशूंना लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यात पशूंमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव पाहता काही नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यातील काही नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी पशुपालकांनी गोचीड निर्मूलनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.- डॉ. नम्रता बाभुळकर, सहायक आयुक्त, रिजनल डीसीज इन्व्हेस्टिगेशन लॅब, अकोला

 

टॅग्स :Akolaअकोला