लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ असलेल्या नवीन जैन मंदिर परिसरातील कमल सोसायटीतील एका घरात अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालत तब्बल एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी उजेडात आली. नवीन जैन मंदिर परिसरातील कमल सोसायटीमधील रहिवासी भावेश श्रीमंत रामगोडा यांचे कुटुंबीय रहिवासी आहे. त्यांच्या एका नातेवाइकावर हैद्राबाद येथे उपचार सुरू असून, त्यांचे कुटुंबीय हैद्राबाद येथे नातेवाइकास भेटण्यासाठी १७ ऑगस्ट रोजी गेले होते. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी ते परत आले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. त्यांनी घरातील रोख रक्कम तपासली असता २१ हजार रुपये रोख, ६0 हजार रुपयांचे दागिने आणि लॅपटॉप व मोबाइल ५५ हजार रुपये असा एकूण ९0 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी भावेश यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिली. पोलिसांनी घटनाथळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरु द्ध गुन्हा दाखल केला, त्यानंतर या प्रकरणातील चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
‘एसपी’ ऑफिसजवळ लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:31 IST
अकोला: पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ असलेल्या नवीन जैन मंदिर परिसरातील कमल सोसायटीतील एका घरात अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालत तब्बल एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी उजेडात आली.
‘एसपी’ ऑफिसजवळ लाखांची घरफोडी
ठळक मुद्देजैन मंदिर परिसरातील कमल सोसायटीतील घटनाचोरट्यांनी धुडगूस घालत एक लाख रुपयांचा मुद्देमाल केला लंपास