अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तीन कामगारांना व्याजासह उपदान(ग्रॅच्युइटी) देण्याचा कामगार न्यायालयाने आदेश दिला. कामगार नेते रमेश गायकवाड, नयन गायकवाड यांच्या प्रयत्नांमुळे कामगारांना न्याय मिळाला. कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी २0१४ मध्ये काही कामगारांच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेऊन तुमचे वय ६0 वर्षेझाले म्हणून कामगारांना कामावरून बंद केले. कामगारांना उपदानाचा कायदा लागू असल्यानंतरही त्यांची उपदानाची रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे लाल बावटा युनियनच्यावतीने नियंत्रण प्राधिकारी यांच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. कामगारांना उपदानाचे पैसे देण्यात यावे, यासाठी कामगार नेते रमेश गायकवाड यांनी कामगारांची बाजू उचलून धरली. त्यामुळे कामगार साळुबाई रामचंद्र लव्हाळे, सायकाबाई वाघपांजर, सुमन दहीकर यांना ६४८00 आणि ७५६00 रुपये या रकमेसह दहा टक्के व्याज द्यावे, असा आदेश कामगार न्यायालयाचे न्यायाधीश संग्राम शिंदे यांनी दिला आहे, असे कामगार युनियन लाल बावटाचे मदन जगताप, संतोष मोरे, विद्याधर ढोरे, सुहास अग्निहोत्री यांनी कळविले. --
कामगारांना व्याजासह ग्रॅच्युइटी देण्याचा कामगार न्यायालयाचा आदेश
By admin | Updated: April 26, 2017 01:47 IST