अकोला : कृषिनगरमध्ये गॅस सिलिंडरने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 04:58 PM2020-06-15T16:58:56+5:302020-06-15T16:59:15+5:30

घरातील साहित्य जळून खाक झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.

In Krishnagar, a gas cylinder burnt | अकोला : कृषिनगरमध्ये गॅस सिलिंडरने घेतला पेट

अकोला : कृषिनगरमध्ये गॅस सिलिंडरने घेतला पेट

Next

अकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषिनगरमध्ये एका घरात गॅस सिलिंडर लिक झाल्यानंतर अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. या आगीत जीवितहानी झाली नसून, घरातील साहित्य जळून खाक झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.
कृषिनगरमधील एका मोठ्या घरात रविवारी रात्री उशिरा गॅस सिलिंडर लिक झाले. त्यामुळे काही वेळातच या सिलिंडरने पेट घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाला दिल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पेटलेले गॅस सिलिंडर घराबाहेर काढले. बराच वेळ ही धावपळ सुरू होती. या आगीमुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र घरातील साहित्य जळून खाक झाल्याने कुटुुंबीयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

Web Title: In Krishnagar, a gas cylinder burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.