शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून एकास चाकूने भोसकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:59 IST

देवीकिसन घावट यांना मारहाण केली आणि धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला.

अकोला: शेतीच्या जुन्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांना मारहाण करून शेतकऱ्यास चाकूने भोसकल्याची घटना शुक्रवारी दुपारी घुसरवाडी येथे घडली. यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अकोट फैल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.घुसरवाडी येथे राहणारे देवीकिसन लक्ष्मण घावट (३४) यांच्या तक्रारीनुसार त्यांच्याच नात्यातील अनिल शालीग्राम घावट, अशोक घावट, अंकुश अनिल घावट, संजय समाधान घावट यांच्यात गत काही वर्षांपासून वाद आहे. शुक्रवारी हा वाद उफाळून आला. या वादात अनिल घावट, अशोक घावट, अंकुश व संजय घावट आणि अनिल व अशोक यांच्या पत्नींनी देवीकिसन घावट यांना मारहाण केली आणि धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात देवीकिसन हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणात अकोट फैल पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी