शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

किसनराव हुंडीवाले हत्याकांडात ५६५ पानांचे दोषारोपपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:10 IST

किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले.

अकोला : अखिल भारतीय महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांची ६ मे रोजी निर्घृण हत्या केल्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले. या हत्याकांडाचे दोषारोपपत्र ५६५ पानांचे असून, १० आरोपी अटकेत आहेत. तीन आरोपी अद्यापही फरार असून, दोन महिला आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे.स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, कौलखेड या शैक्षणिक संस्थेतील सभासदांच्या निवड प्रक्रियेचा वाद २०१४ पासून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सुरू आहे. याच वादाच्या प्रकरणात सोमवार, ६ मे रोजी दुपारी १२ वाजता किसनराव हुंडीवाले न्यास नोंदणी कार्यालयात त्यांचा मुलगा प्रवीण यांच्यासोबत उपस्थित असताना भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल सुखदेव तायडे, मयूर गणेशलाल अहीरे, दिनेश ठाकूर, प्रतीक दत्तात्रय तोंडे व साबीर यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात येऊन किसनराव हुंडीवाले यांची हत्या केली होती. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामधील विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, श्रीराम कसदन गावंडे यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली तर सतीश तायडे, विशाल तायडे, मयूर अहीर, दिनेश ठाकूर, प्रतीक तोंडे या पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने सूरज प्रल्हाद गावंडे यास बुलडाणा जिल्ह्यातील अटक केली होती. या आरोपींना सहकार्य करणाऱ्या दीपाली छोटू गावंडे आणि अम्रिता प्रवीण गावंडे या दोन महिलांनाही आरोपी करण्यात आले होते; मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास तत्कालीन शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने व त्यांच्या पथकाने करून ५६५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. चार आरोपींच्या जामिनावर सुनावणीया हत्याकांड प्रकरणात प्रवीण गावंडे, राजपूत व आणखी दोन जणांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर १३ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKisanrao Hundiwale Murder Caseकिसनराव हुंडीवाले हत्याकांडCrime Newsगुन्हेगारी