शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

किसान सन्मान निधी योजनेच्या याद्यांसाठी ग्रामविकास विभागात टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 15:52 IST

शेतकऱ्यांची यादी तयार करण्यासाठी ग्रामसेवक, विस्तार अधिकाºयांनी याद्याच न दिल्याने शेतकरी लाभापासून वंचित असल्याची माहिती पातूर तहसीलदारांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिली.

अकोला: लोकसभा निवडणुकीपूर्वी शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही. पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यासाठी ग्रामसेवक, विस्तार अधिकाºयांनी याद्याच न दिल्याने शेतकरी लाभापासून वंचित असल्याची माहिती पातूर तहसीलदारांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिली. या बाबीची गंभीर दखल घेतली गेल्याने ग्रामसेवकांनी तातडीने कामाला सुरुवात केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अनेक शेतकºयांची तहसील कार्यालयात पायपीट सुरू आहे; मात्र अधिकारी, कर्मचारी कोणीही केव्हा निधी मिळेल, याबाबत उत्तर द्यायला तयार नसल्याने ही योजना फसवी ठरणार तर नाही ना, असा प्रश्न शेतकºयांना पडत आहे.दरम्यान, पात्र शेतकºयांच्या याद्या तयार करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांची नियुक्ती करण्यात आली. सोबतच विस्तार अधिकारी, गटविकास अधिकाºयांनी आढावा घेऊन माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. त्यानुसार गावपातळीवर काम करणे अपेक्षित असताना पातूर तालुक्यातील ग्रामसेवकांनी या कामाला सुरुवातच केली नाही. ही बाब तहसीलदारांनी ३० जून रोजीच्या पत्रानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना कळवली. त्यामध्ये आलेगाव मंडळातील चरणगावाची जबाबदारी ग्रामसेवक बी.बी. आडे, जी.एस. वावगे यांच्याकडे होती. तर पर्यवेक्षक म्हणून विस्तार अधिकारी आर.एस. गवई यांची नियुक्ती आहे. यापैकी कुणीही कामाला सुरुवात केली नाही. सोबतच पर्यवेक्षक असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी दीपमाला भटकर, विस्तार अधिकारी डी.एम. ननीर, ए.पी. लव्हाळे यांनीही कामाला सुरुवात केली नसल्याचे तहसीलदारांनी जिल्हाधिकाºयांसह मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्रातून कळवले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तातडीने कामाला सुरुवात करण्याचे बजावले. रक्कम कधी मिळणारयोजनेच्या माध्यमातून शेतकºयांना वर्षाकाठी सहा हजार रुपये देण्याची घोषणा शासनाने केली. प्रत्येक शेतकºयाच्या खात्यात तीन टप्प्यांत प्रत्येकी दोन हजार रुपये वळते करण्यात येणार होते. त्यापैकी काही शेतकºयांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला तर काही शेतकºयांना अद्याप काहीही मिळाले नाही. यावर्षीचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकºयांची पेरणीसाठी जुळवाजुळव करताना दमछाक होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना