शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरण; तीन आरोपी पोलिसांना शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:23 IST

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्रीराम गावंडे त्यांचा मुलगा विक्रम गावंडे व धिरज प्रल्हाद गावंडे या तीघांनी मंगळवारी पहाटे सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली.

अकोला: महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक खडकी येथील रहिवासी किसनराव हुंडीवाले यांची सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सार्वजनिक न्यास नोेंदणी कार्यालयात (न्यायालयात)अग्निशमन सिलिंडर डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या  नऊ आरोपींपैकी तीन मुख्य आरोपींनी मंगळवारी रामदासपेठ पोलिसांसमोर शरणागती पत्करली. यामध्ये भाजयुमोचा प्रदेश उपाध्यक्ष छोटू ऊर्फ विक्रम गावंडे, त्याचे वडील श्रीराम गावंडे आणि चुलत भाऊ धीरज गावंडे या तिघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये हुंडीवाले यांचे वकील अ‍ॅड. नितीन धूत यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे.स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, कौलखेड या शैक्षणिक संस्थेतील सभासदांच्या निवड प्रक्रियेचा वाद २०१४ पासून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सुरू आहे. याच वादाच्या प्रकरणात सोमवार ६ मे रोजी दुपारी १२ वाजता किसनराव हुंडीवाले न्यास नोंदणी कार्यालयात त्यांचा मुलगा प्रवीण यांच्यासोबत उपस्थित असताना भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे रा. खेतान नगर, कौलखेड आणि सतीश तायडे, विशाल तायडे व साबीर रा. बार्शीटाकळी या नऊ जणांसह त्यांच्या चार साथीदारांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात येऊन किसनराव हुंडीवाले यांच्यावर हल्ला चढविला होता. टेबल, खुर्ची आणि लाकडी काठ्यांनी मारहाण करण्यात आली तर विक्रम ऊर्फ छोटू गावंडे याने अग्निरोधक सिलिंडरने त्यांच्या डोक्यावर हल्ला केल्याने हुंडीवाले यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्यानंतरही रणजित गावंडे व काहींनी धारदार टोचाने त्यांच्या चेहºयावर आणि डोक्यावर वार केल्याची माहिती आहे. या प्रकरणाची तक्रार प्रवीण हुंडीवाले यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी या नऊ जणांसह त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध खुनाचा व दंगलीचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. मंगळवारी सकाळी विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे आणि श्रीराम कसदन गावंडे या तीन आरोपींना रामदासपेठ पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, बुधवारी सकाळी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या तीन आरोपींना सिव्हिल लाइन्स पोलिसांचा ताब्यात देण्यात आले आहे. तर फरार असलेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMurderखूनKisanrao Hundiwale Murder Caseकिसनराव हुंडीवाले हत्याकांड