हत्या करणाऱ्या दाम्पत्यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:26 AM2018-05-18T05:26:08+5:302018-05-18T05:26:08+5:30

कचरा टाकण्यावरून हटकल्याने झालेल्या वादातून शेजा-याची घरात घुसून हत्या करणाºया दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Killer killer | हत्या करणाऱ्या दाम्पत्यास जन्मठेप

हत्या करणाऱ्या दाम्पत्यास जन्मठेप

Next

अकोला : कचरा टाकण्यावरून हटकल्याने झालेल्या वादातून शेजा-याची घरात घुसून हत्या करणाºया दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयाने गुरुवारी ही शिक्षा सुनावली.
पळसो बढे येथे अरुण इंगळे (५८) यांच्या घराशेजारी विनोद शशिकांत इंगळे (३६) व त्याची पत्नी पूजा (३२) हे दाम्पत्य राहाते. २६ नोव्हेंबर २0१६ रोजी सकाळी पूजाने अंगणातील कचरा अरुण यांच्या घराजवळ टाकला. त्यामुळे अरुण यांनी तिला हटकले.
यामुळे संतप्त झालेल्या विनोद व पूजा यांनी दुपारी अरुण यांच्या घरात घुसून त्यांना काठीने मारहाण केली. यात अरुण यांचा मृत्यू झाला.

Web Title: Killer killer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.