शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

क्राइम मिटिंगमध्ये ‘रॉकेल प्रकरण’ पेटले!

By admin | Updated: September 29, 2016 01:54 IST

पोलीस अधीक्षक मीणा यांनी केली अधिकार्‍यांची कानउघाडणी.

अकोला, दि. २८- इंधन टाकीमध्ये डीझलऐवजी रॉकेल असलेला ट्रक आकोट पोलिसांनी ५0 हजार रुपये घेऊन सोडल्याचे खळबळजनक प्रकरण एका ह्यकॉल रेकॉडिर्ंगह्णमुळे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा ह्यलोकमतह्णने मंगळवारी पर्दाफाश केला. त्यानंतर लगेच बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी गुन्हे आढावा बैठक घेऊन संबंधित पोलीस अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले.आकोट शहरातील जीवन टायर्स नामक दुकानासमोर एम एच ४0 एके ४७५0 क्रमांकाच्या ट्रकचे टायर बदलण्याचे काम सुरू होते. नेमके त्याचवेळी आकोट शहर पोलीस स्टेशनमधील काही पोलीस कर्मचार्‍यांनी त्या ट्रकची झडती घेऊन, डीझल टॅँकमध्ये रॉकेल असल्याच्या संशयावरून ट्रक ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणला. दुपारच्या सुमारास ट्रक पोलीस स्टेशनमध्ये लावल्यानंतर दिवसभर हा ट्रक ठाण्यातच उभा ठेवून कोणतीही कारवाई न करता ५0 हजार रुपये घेऊन सोडून दिला. या ट्रकमध्ये टाकण्यासाठी आकोटातील बड्या रॉकेल माफियाकडून रॉकेल घेण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी सदर रॉकेल माफियाला ट्रक पकडल्यासंदर्भात एका व्यक्तीने विचारणा केली असता, या रॉकेल माफियाने हप्ते दिल्यावरही पोलिसांनी ट्रक पकडल्याचा आरोप रेकॉडीर्ंगमध्ये केला आहे. हा ट्रक सोडण्यासाठी सदर रॉकेल माफियालाच ५0 हजार रुपये द्यावे लागल्याने त्याने पोलिसांच्या या डबल हप्तेखोरीवर प्रचंड संताप व्यक्त केला होता. लोकमतने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. त्यानंतर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आकोट एसडीपीओंनी केली चौकशीरॉकेलचा ट्रक पैसे घेऊन सोडलेल्या प्रकाराची आकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे यांनी चौकशी केल्याची माहिती आहे. मनवरे यांनी एक हेड काँस्टेबल व तीन पोलीस कर्मचार्‍यांना बुधवारी याबाबत विचारणा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकही गुरुवारी आकोटमध्ये दाखल होऊन चौकशी करणार असल्याची माहिती आहे.असा व्हावा तपास! रॉकेल माफियाने केलेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्यासाठी ही क्लिप फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात यावी, त्यानंतर संभाषण झालेल्या दोन्ही व्यक्तींचे कॉल डाटा रेकॉर्ड (सीडीआर) काढण्यात यावे, तसेच दोन्ही व्यक्तींच्या आवाजाचे नमुने घेऊन त्याचीही फॉरेन्सिक लॅबकडे तपासणी केल्यास या प्रकरणातील सत्यता समोर येईल. यासाठी पोलीस प्रशासनाने सदर प्रकरणाची अशा अनुषंगाने चौकशी केल्यास प्रकरणातील सत्यता समोर येणार असल्याची माहिती ज्येष्ठ फौजदारी विधिज्ञांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.आकोट येथील रॉकेलचा ट्रक प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांची कानउघाडणी केली असून, पूर्ण माहिती घेत आहोत. गुन्हे आढावा बैठकीमध्ये रॉकेल प्रकरणावर चांगलीच चर्चा करण्यात आली. आणखी चौकशी करून लवकरच दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.-चंद्रकिशोर मीणा, पोलीस अधीक्षक.