शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची राजस्थानातून सुटका; आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 18:06 IST

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून पिडीत मुलीची राजस्थानातून सुटका केली तसेच एका आरोपीस गजाआड केले.

अकोट(अकोला) : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या एका गावातून १७ वर्षीय मुलीला गावातील दोघांनी पळवून नेले होते. या मुलीला दोघांनी राजस्थान येथे नेउन तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून पिडीत मुलीची राजस्थानातून सुटका केली तसेच एका आरोपीस गजाआड केले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या एका गावातील १७ वर्षीय मुलगी १६जून रोजी अकोटात संगणक शिकायला जात असल्याचे सांगून बेपत्ता झाली होती. याच गावातील एक १७ आणि २३ वर्षीय युवकही बेपत्ता झाल्याची तक्रार अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला १६ जून रोजी दाखल झाली होती.दोन युवकांनी अल्पयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. ठाणेदार ज्ञानोबा फळ यांनी कुठलीही दिशा मिळत नसताचा तपास सुरूच ठेवला. दोन्ही युवकांनी अल्पवयीन मुलीला गुजरात राज्यातील वापी येथे नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ग्रामीण पोलिसांचे पथक वापी येथे रवाना करण्यात आले. मात्र, वापी येथे पथक पोहचण्यापूर्वीच ते तिघे उदयपूरजवळ गेल्याची माहिती पेलिसांना मिळाली. पथकाने उदयपूर गाठून तेथे स्थानिकांना बेपत्ता झालेल्या तिघांचे फोटो दाखवले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिघेही राहत असलेल्या घरात धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले. या ठिकाणी त्यांना विचारपुस केली असता सदर अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्या सोबत असलेल्या अल्पवयीन मुलाने फुस लावुन पळवुन नेले.तसेच तिच्यावर या कालावधीत लैंगीक अत्याचार केल्याचे समोर आले. यामध्ये त्याला त्याच्या सोबत असलेल्या रविंद्र झगडे याने सुरवातीपासुन सहकार्य केल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीसांनी एक अल्पवयीन मुलगा व रविन्द्र झगडे याच्याविरूध्द भादंवी कलम ३६६ अ, ३७६ (२) एन, सहकलम ३ अ, ४ पोक्सो नुसार गुन्हा दाखल केला आहे. पिडीत मुलीची व अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्यांना त्यांच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आले,तर आरोपी रविन्द्र वसंतराव झगडे यास पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनात अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड, पोउपनि सुवर्ना गोसावी, एएस.आय. नारायण वाडेकर, गजानन भगत, अनिल षिरसाट, प्रविण गवळी व नंदु कुलट यांनी केली.

टॅग्स :akotअकोटAkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी