शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

खरीप पेरणी तोंडावर; पण मिळाला नाही पीक विमा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 17:26 IST

यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणी तोंडावर आली असली तरी, पीक विमा रकमेचा लाभ शेतकºयांना मिळाला नाही.

- संतोष येलकर

अकोला: गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या शेतकºयांना पीक विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणी तोंडावर आली असली तरी, पीक विमा रकमेचा लाभ शेतकºयांना मिळाला नाही. अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकºयांनी पीक विमा काढला. कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी इत्यादी खरीप पिकांचा विमा काढण्यात आला आला. विमा हप्त्याची रक्कम (प्रीमियम) संबंधित बँकांमध्ये जमा करून शेतकºयांनी पीक विमा काढला. पीक विमा योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकºयांसाठी संबंधित विमा कंपनीकडून पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली; मात्र शेतकºयांच्या बँक खात्यात अद्यापही पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली नाही. पावसाळा सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला. खरीप पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, अकोला, बुलडाणा, वाशिमसह इतर जिल्ह्यातही शेतकºयांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली नाही. दुष्काळी परिस्थितीत आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना गतवर्षी काढलेल्या पीक विम्याचा लाभ मिळाला नसल्याने, खरीप पेरणीचा खर्च भागविणार कसा, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने पीक विम्याची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला.

विमा कंपनी कार्यालयाकडे माहितीच नाही !गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांसाठी पीक व महसूल मंडळनिहाय पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली. यासंदर्भात आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीच्या अकोल्यातील जिल्हा कार्यालयाशी सोमवारी संपर्क साधला असता, जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकºयांसाठी तूर, मूग, उडीद, ज्वारी या पिकांकरिता महसूल मंडळनिहाय पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली; मात्र जिल्ह्यातील किती शेतकºयांना पीक विम्याची किती रक्कम मंजूर करण्यात आली, यासंदर्भात माहिती उपलब्ध नसल्याचे विमा कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात किती शेतकºयांसाठी पीक विम्याची किती रक्कम मंजूर करण्यात आली, यासंदर्भात आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीच्या जिल्हा शाखा कार्यालयाकडून माहिती मागितली आहे. माहिती प्राप्त झाल्यानंतर मंजूर पीक विम्याची रक्कम आठ दिवसांत जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात करण्यात येणार आहे.- आलोक तारेणियाव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा