शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यात खरीप पेरणीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 18:55 IST

Kharif sowing begins in Murtijapur taluka : पेरणी योग्य पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे.

- संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यात आठवडाभरात अनेक ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे. दरम्यान तालुक्यात मुबलक खत उपलब्ध असले तरी महाबीज बियाण्याचा प्रचंड तुटलडा मात्र तुटवडा जाणवत आहे.        तालुक्यात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकरी सुखावला असला तरी तालुक्यातील काही भागातच पेरणी योग्य पाऊस झाला आहे. या भागात शेतकरी खरीप पेरणीसाठी सरसावले आहेत. मूर्तिजापूर, कुरुम, शेलू बाजार मंडळात आतापर्यंत ७५ मिलीमीटर च्या वर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेती मशागत तातडीने आटोपून पेरणीला सुरुवात केली असली तरी संपूर्ण तालुक्यात आतापर्यंत केवळ ६८ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. आवश्यकते नुसार संपूर्ण तालुक्यासाठी ३ हजार ५०० क्विंटल महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची मागणी करण्यात आली होती परंतु ३ हजार १०० क्विंटल महाबीज बियाणे पुरविण्यात आले असल्याने प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. तर खासगी कंपनीच्या ८ हजार ८०० क्विंटल मागणी नुसार पुर्तता झाली असली तरी बाजारात सद्यस्थितीत तोकड्या प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे. भविष्यात महाबीज बियाणे बाजारात उपलब्ध होण्याची आशा मावळली असल्याने शेतकऱ्यांनी घरचे बियाणे उगवण शक्ती प्रक्रीया तपासून घेऊन व बिज प्रक्रीया करुन बियाणे वापण्याचा सल्ला कृषी विभागातर्फे देण्यात आला आहे. सद्यस्थितीत बाजारात महाबीज वगळता इतर कंपन्यांचे सोयाबीन बियाणे केवळ ६०० क्विंटल बतियाने बाजारात उपलब्ध आहे. पिकांसाठी आवश्यक असलेले सर्व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांची खताची चिंता मिटली आहे. हल्ली  कुठलेही खत उपलब्ध आहे. एकूण ३ हजार टन खतसाठा आजमितीस आहे. तर त्या डीएपी ३७५ मेट्रिक टन असल्याने शेतकऱ्यांची खतांची चिंता मिटली असली तरी महाबीजचे बियाणे १२ टक्केच उपलब्ध झाल्याने व इतर बियाण्यांच्या किंमती पेक्षा स्वस्त असल्याने महाबीज बियाण्याची वाणवा होत आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस