शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही खरीप उत्पादन घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 18:34 IST

पाऊस सुरू असल्याने शेते शेवाळली असूून, पिकांना प्रकाशसंश्लेषणही होत नसल्याने पिके पिवळी आहेत.

अकोला: विदर्भात सतत तुरळक पाऊस सुरू असल्याने शेते शेवाळली असूून, पिकांना प्रकाशसंश्लेषणही होत नसल्याने पिके पिवळी आहेत. परिणामी यावर्षीही उत्पादन घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.विदर्भात ५० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली असून, सर्वाधिक जास्त कापूस व सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. पावसाळ््याच्या सुरुवातीला पाऊस पडला नसल्याने पेरण्यांना विलंब झाला. पेरणीनंतर पुन्हा चार आठवडे पावसाचा खंड पडल्याने हजारो हेक्टरवरील पिके हातची गेली. शेतकऱ्यांना त्यावर नांगर फिरवावा लागला. २६ जुलैपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. तथापि, हा पाऊस दमदार नसला तरी सतत तुरळक स्वरू पाचा पडत असून, कायम ढगाळ वातावरण असल्याने पिकांना प्रकाशसंश्लेषण होत नसून, श्ोतात बुरशी निर्माण झाली. परिणामी पिके पिवळी पडली आहेत. सध्या सोयाबीन पीक फुलोºयावर येण्याच्या अवस्थेत आहे. तथापि, या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यावर परिणाम होताना दिसत आहे. कापूस पिकांची स्थिती हीच आहे. इतर पिके पिवळी पडली आहेत. हे वातावरण कीड, रोगांना पोषक ठरत असून, सोयाबीनवर प्रचंड कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशीवर बोंडअळी तर आलीच रसोशोषण करणाºया किडींचा प्रादुर्भावही वाढला आहे; तणनाशके निष्प्रभावी ठरत असल्याने पिकांमध्ये तण प्रचंड वाढले आहे. कीड, रोग, शेतातील तणांचे व्यवस्थापन, नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी जहाल, आत्यांतिक विषारी कीटकनाशके फवारणी करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे; परंतु प्रतिकूल वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढत असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.

सतत पाऊस सुरू असल्याने जमीन शेवाळली असून, पिकांच्या मुळांना सूर्यप्रकाश मिळत नसल्याने पिके पिवळी पडत आहेत. या सर्व परिस्थितीचा पिकांवर परिणाम होत असला तरी शेतकºयांनी घाबरू न न जाता कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार पिकांचे व्यवस्थापन करावे. - डॉ.जे.पी. देशमुख,ज्येष्ठ शास्त्रज्ञ,कृषी विद्यावेत्ता,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ