शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी कवठा बॅरेज मार्चपर्यंत पूर्ण करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:40 IST

खारपाणपट्टय़ात सिंचन क्षेत्रात वाढ होण्याकरिता व शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न फुलविण्याकरिता राज्यपालांच्या विदर्भ अनुशेष यादीत समाविष्ट असणार्‍या महत्त्वाकांक्षी प्रकल्प नेर धामणा व कवठाचे काम मार्चपर्यंत पूर्ण करून जूनपर्यंत पाणी साठविण्यासाठी सज्ज करण्याचे आदेश विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिले.

ठळक मुद्देपाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुर्वे यांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा फाटा : खारपाणपट्टय़ात सिंचन क्षेत्रात वाढ होण्याकरिता व शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न फुलविण्याकरिता राज्यपालांच्या विदर्भ अनुशेष यादीत समाविष्ट असणार्‍या महत्त्वाकांक्षी प्रकल्प नेर धामणा व कवठाचे काम मार्चपर्यंत पूर्ण करून जूनपर्यंत पाणी साठविण्यासाठी सज्ज करण्याचे आदेश विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिले.यावेळी त्यांनी कवठा प्रकल्पातून १८00 हे. शेती सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकर्‍यांची पाणी वापर संस्था तयार करून सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतीसाठी पाणी घेण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन केले. विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पासह १00 प्रकल्प पूर्ण करण्याचा व विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर करण्याचा मानस असल्याचे संचालक सुर्वे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सदर प्रकल्प पूर्ण करण्याकरिता निधी उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आ.बळीराम सिरस्कार यांनीही खारपाणपट्टय़ातील प्रकल्प तत्काळ पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता संजय घाणेकर, अधीक्षक अभियंता देसाई, कार्यकारी अभियंता जयंत शिंदे, उपविभागीय अभियंता मनोज बोंडे, अभियंता दिलीप भालतिलक, प्रकल्प व्यवस्थापक संचालक रावसाहेब, प्रोजेक्ट मॅनेजर पठ्ठण शेट्टी  आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :Ner-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेज