अकोला : कर्नाटक विधानसभेच्या निकालात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने येथील भाजप कार्यालयसमोर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.कर्नाटक विधानसभेचे निकाल मंगळवारी जाहीर झाल्याने प्रारंभीपासूनच भाजपा उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतल्याचे दिसून आले होते. दुपारी बारा वाजता भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे समोर येता भाजपा कार्यकर्ते खुले नाट्य गृहासमोरील पक्ष कार्यालयासमोर एकत्र आले. एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी महापौर विजय अग्रवाल, भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती विशाल इंगळे, गिरीश जोशी, गटनेता राहुल देशमुख, नगरसेवक अजय शर्मा, बाळ टाले, विजय इंगळे, अमोल गोगे, अनिल गरड, मिलिंद राऊत, अनिल मुरुमकार, नगरसेविका आरती घोगलिया, सुमनताई गावंडे, पल्लवी मोरे,रश्मी अवचार, नंदा पाटील, योगीता पावसाळे, शारदा ढोरे, जान्हवी डोंगरे, दिपाली जगताप श्याम विचंनकर, डॉ. किशोर मालोकार, हरीभाऊ काळे, दिप मनवानी, पवन पाडीया, दिलीप मिश्रा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्नाटक विधानसभा निवडणूक विजयाचा अकोला भाजपने केला जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 13:38 IST
अकोला : कर्नाटक विधानसभेच्या निकालात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने येथील भाजप कार्यालयसमोर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
कर्नाटक विधानसभा निवडणूक विजयाचा अकोला भाजपने केला जल्लोष
ठळक मुद्देदुपारी बारा वाजता भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे समोर येता भाजपा कार्यकर्ते खुले नाट्य गृहासमोरील पक्ष कार्यालयासमोर एकत्र आले. एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा केला.