शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

जमाबंदी आयुक्त करणार अकोल्यातील भूखंड घोटाळयाचा तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 15:18 IST

अकोल्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने कागदपत्रामध्ये फेरफार करून शासनाच्या मालकीचा २० कोटीचा भूखंड हडपल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केला होता. या संदर्भात विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या घोटाळयाची सविस्तर चौकशी राज्याचे जमाबंदी आयुक्त चोखलिंगम यांच्या मार्फत चौकशी करण्याची घोषणा शुक्रवारी केली.

ठळक मुद्दे विधीमंडळात चंद्रकांतदादा पाटील यांनी केली घोषणा.आमदार रणधीर सावरकर यांनी सभागृहात उपस्थित केला होता प्रश्न. झांबड पिता-पुत्राविरुद्ध आढळलेल्या ठोस पुराव्यावरून त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. शासनाच्या मालकीचा २० कोटीचा भूखंड हडपल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केला होता.

- सचिन राऊत

 अकोला : अकोल्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने कागदपत्रामध्ये फेरफार करून शासनाच्या मालकीचा २० कोटीचा भूखंड हडपल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केला होता. याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या आरोपी फरार आहेत. दरम्यान या संदर्भात विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या घोटाळयाची सविस्तर चौकशी राज्याचे जमाबंदी आयुक्त चोखलिंगम यांच्या मार्फत चौकशी करण्याची घोषणा शुक्रवारी केली.  अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी शुक्रवारी सभागृहात भूखंड घोटाळ्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून, तब्बल २० कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि  कर्मचाऱ्यांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात आॅनलाइन नोंद घेऊन हा भूखंड कागदोपत्री हडपण्यात आला होता. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले, तसेच पाठपुरावा केला. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अमर डिकाव यांनी तक्रार केली; मात्र पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश कुळकर्णी यांच्या तक्रारीवरून दीपक रमेश झांबड व रमेश गजराज झांबड यांच्यासह भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० ब, आयटी अ‍ॅक्ट कलम ६५ नुसार गुन्हा दाखल केला; मात्र पिता-पुत्राने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धावपळ केली. दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने सखोल अभ्यास केल्यानंतर झांबड पिता-पुत्राविरुद्ध आढळलेल्या ठोस पुराव्यावरून त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सध्या हे आरोपी फरार आहेत.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरCity kotwali Police Stationसिटी कोतवाली पोलीस स्टेशन