शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

नवीन आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारांनी सजग व्हावे: पत्रकारिता गौरव सोहळ्यात मान्यवरांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 13:26 IST

इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या या व्यवस्थेत आगामी काळ हा आॅनलाइन वृत्तपत्रांचा राहणार आहे. त्यामुळे येणारी नवी आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य मिळवित पत्रकारांनी सजग व्हावे, अशी भावना जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आयोजित द्विवार्षिक उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केली.

अकोला: अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या या व्यवस्थेत आजची पत्रकारिता ही जलद आणि गतिमान झाली आहे. सोशल मीडियानेही जग पादाक्रांत केले आहे. इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या या व्यवस्थेत आगामी काळ हा आॅनलाइन वृत्तपत्रांचा राहणार आहे. त्यामुळे येणारी नवी आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य मिळवित पत्रकारांनी सजग व्हावे, अशी भावना जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आयोजित द्विवार्षिक उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केली. पत्रकारांच्या गौरव सोहळ्यास संपादक प्रकाश दुबे, संपादक श्रीपाद अपराजित, खा. संजयभाऊ धोत्रे, ज्येष्ठ विचारवंत प्रा. शरद पाटील, माजी मंत्री अजहर हुसेन, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मीरसाहेब, अकोला जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रमोद लाजुरकर प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रांच्या व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या एकूण नऊ पत्रकारांना जिल्हा पत्रकार संघातर्फे पुरस्कृत करण्यात आले. शाल, नारळ, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.समाजाच्या प्रत्येक घटकाच्या समस्यांना पत्रकार वाचा फोडतो; मात्र स्वत:च्या व्यथा मांडू शकत नाही. चतुरस्र असलेल्या पत्रकारांचा बहुमान होणे कौतुकास्पद बाब असून, समाजासाठी एक आरसा म्हणून असे उपक्रम घेतले पाहिजे, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. या सोहळ्याच्या प्रारंभी पुलवामा शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अतिथींचा शाल व नारळ देऊन प्रल्हाद ढोकणे, अनंत अहेरकर, मोहन जोशी, कीर्तीकु मार वर्मा, गजानन सोमाणी, रामदास वानखडे, संजय खांडेकर, विजय शिंदे, सुरेश नागापुरे, अनिल गिºहे, प्रदीप काळपांडे, विठ्ठलराव देशमुख, उमेश अलोने व प्रवीण ढोणे यांनी सत्कार केला.पाहुण्यांचा परिचय मिलिंद गायकवाड व राजू उखळकर यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मीरसाहेब यांनी केले. संचालन जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रमोद लाजुरकर व संजय खांडेकर यांनी संयुक्तपणे केले. आभार उमेश अलोने यांनी केले. राष्ट्रगीताने या गौरव सोहळ्याचा समारोप झाला. या गौरव सोहळ्याला महाराष्ट्राचे लोककवी विठ्ठल वाघ, प्रा. राजाभाऊ देशमुख, उपमहापौर वैशाली शेळके, ‘लोकमत समाचार’चे प्रभारी अरुणकुमार सिन्हा, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कविश्वर, डॉ. अशोक ओळंबे, कमल आलिमचंदानी, डॉ. गजानन नारे, प्रा. अशोक जडे, मोहन हुरपडे, प्रा. मोहन खडसे, सज्जाद हुसेन, सचिन देशपांडे, प्रबोध देशपांडे, राज बाहेती, गजानन शेळके, प्रवीण लाजुरकर, दीपक देशपांडे, शरद गांधी, बी. एस. इंगळे, नीरज आवंडेकर, लक्ष्मण हागे, अतुल जयस्वाल, रवी वानरे, इम्रान खान, संजय अलाट, अ‍ॅड. नीलिमा शिंगणे, वंदना शिंगणे, कल्याणी देशपांडे, केतकी देशपांडे, उमेश जामोदे, अक्षय गवळी, संजय चक्रनारायण, सागर झांबरे, राजकुमार वैराळे, दीपचंद चव्हाण, उत्तम दाभाडे, अनिल गिºहे, गणेश सोनोने, विवेक राऊत, नासिरभाई, अमित गावंडे, विनय टोले, रवी वानखडे, विलास खंडारे यांच्यासह बहुसंख्येने जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट व्यवस्थापन कमल शर्मा, उमेश जामोदे व नासिरभाई यांनी केले.

 सर्वोत्कृष्ट ठरलेले जिल्ह्यातील नऊ पत्रकारस्व. गो. रा. उपाख्य आप्पासाहेब वैराळे यांच्या स्मृतीत दिल्या जाणारा कला साहित्य उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ‘लोकमत’चे हॅलो हेड राजेश शेगोकार यांना प्रदान करण्यात आला, तर स्व. दिनेश कक्कड स्मृतीत दिला जाणारा क्रीडा न्यूज व्हिज्युलाइज छायाचित्रकार पुरस्कार प्रवीण ठाकरे यांना बहाल करण्यात आला. स्व. मधुसुदन ऊर्फ नानासाहेब वैराळे स्मृती ग्रामीण विकास वार्ता पुरस्कार मूर्तिजापूरचे पत्रकार दिलीप देशमुख यांना दिला गेला. त्यावेळी वैराळे परिवाराच्या प्रसारमाध्यमाचे जाफरभाई व सुनील मायी उपस्थित होते. स्व. कमलकिशोर बियाणी स्मृती शहरी विकास वार्ता उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार श्रीकांत उखळकर यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ गजानन सोमाणी प्रामुख्याने उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार स्व. शांताराम सरदेशपांडे स्मृती शोध वार्ता उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नीलेश जोशी यांना प्रदान झाला. हेमंत सरदेशपांडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. स्व. रामेश्वरलाल अग्रवाल स्मृती धार्मिक व सांस्कृतिक उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार जयेश जग्गड यांना बहाल झाला. खा. मो. अजहर हुसेन स्मृतीचा सामाजिक एकतेचा पत्रकारिता पुरस्कार अकोटचे रमेश तेलगोटे यांना दिला गेला. माजी मंत्री अजहर हुसेन यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार दिला गेला. स्व. जमनलाल गोयनका स्मृतीचा व्यापार व उद्योग लिखाण पुरस्कार श्याम शर्मा यांना प्रदान करण्यात आला. स्व. आबाराव देशमुख स्मृतीत दिल्या जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुहास कुळकर्णी यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी स्व. आबाराव देशमुख यांच्या सुकन्या दीपाली लांबे उपस्थित होत्या. 

 

टॅग्स :AkolaअकोलाJournalistपत्रकार