‘आयटीआय’मध्ये प्रशिक्षणातून रोजगाराचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 01:59 PM2019-06-23T13:59:58+5:302019-06-23T14:00:13+5:30

येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयडियाच्या कल्पनेतून काही हटके प्रयोग केले जातात.

Job Lessons From Training In 'ITI' | ‘आयटीआय’मध्ये प्रशिक्षणातून रोजगाराचे धडे

‘आयटीआय’मध्ये प्रशिक्षणातून रोजगाराचे धडे

Next

- प्रवीण खेते
अकोला : ‘शिका अन् कमवा’ या उपक्रमांतर्गत अनेक महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम चालविले जातात; परंतु विद्यार्थी घेत असलेल्या शिक्षणाला बाजारपेठ उपलब्ध करून देणारे उपक्रम क्वचितच हाती घेतले जातात. असाच काहीसा उपक्रम येथील मुलींच्या आयटीआयमध्ये विविध माध्यमातून राबविण्यात येतो. यांतर्गत प्रशिक्षणार्थीनींना प्रशिक्षणासोबतच स्वयंरोजगाराचेही धडे दिले जात असल्याने त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होत आहे.
ज्याच्या अंगी कौशल्य, त्याला रोजगाराची कमी नाही; पण हल्ली कौशल्य असूनही अनेकांना रोजगार मिळत नाही. विशेषत: महिला व मुलींच्या बाबतीत हा प्रकार मोठ्या प्रमाणात घडतो. हे चित्र बदलण्यासाठी येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयडियाच्या कल्पनेतून काही हटके प्रयोग केले जातात. त्यापूर्वी त्यांच्या अंगी प्रात्यक्षिक शिक्षणातून विविध कलागुण रुजविले जातात; पण त्यांच्यातील या कलागुणांना जोवर बाजारपेठ मिळत नाही, तोवर या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या पायावर उभे राहण्याचे धाडस येणार नाही. हीच नाळ ओळखत येथील मुलींच्या आयटीआयमध्ये वर्षभर विविध उपक्रम राबवून प्रशिक्षणार्थींसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिल्या जात आहे. सण समारंभ असो वा शहरातील महत्त्वाचे उत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमातून येथील प्रशिक्षणार्थीनींना रोजगाराचे धडेदेखील दिले जातात.


या उत्पादनांची निर्मिती

  • मशरूम पावडरपासून हायप्रोटीन बिस्कीट
  • सुगंधी उटणे
  • ब्लॉक प्रिंटिंग
  • सौंदर्यप्रसाधने
  • मैदा विरहित बिस्कीट



राज्यस्तरीय कृषी विद्यापीठांतर्गत होणाºया कृषी प्रदर्शनामध्ये विविध उत्पादनांची निर्मिती करून त्याची स्वत: विक्री केली. या पद्धतीने विविध संधींचा उपयोग घेऊन प्रशिक्षणार्थीनींना बाजारपेठ मिळवून दिल्या जाते. शिवाय, त्यांच्यातील मार्केटिंग कौशल्यही विकसित करण्याचा प्रयत्न विविध उपक्रमातून होत असतो.
- प्राचार्य प्रमोद भंडारे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुली) अकोला.

 

Web Title: Job Lessons From Training In 'ITI'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.